बुधवारी महाराष्ट्रात पावसाची उणीव असलेल्या भागात चांगलाच जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला तसेच विदर्भात थोड्या कमी तीव्रतेचा पाऊस झाला.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेनुसार महाराष्ट्राच्या जवळपास बऱ्याच हवामान प्रणाली तयार झालेल्या असून त्यामुळे राज्यातील पश्चिम भागात त्याचा परिणाम दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रवाती अभिसरणाचा पट्टा पूर्व ते पश्चिम असा असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार होणाऱ्या वाऱ्याच्या वेगातील बदलांमुळे पावसाचा जोर वाढेल.
याच दरम्यान मध्य महाराष्ट्रापासून ते लक्षद्वीप पर्यंत अजून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि त्यामुळे पावसाचा जोर वाढण्यास मदतच होते आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरात असाच मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील. मान्सूनचा पाऊस येते ४ ते ५ दिवस असाच सुरु राहील पण त्याची तीव्रता कमी अधिक असेल.
या पावसामुळे आधी निर्माण झालेली ५०% पावसाची कमतरता बऱ्याच प्रमाणात भरून निघेल. दिनांक ९ सप्टेंबर रोजी मराठवाडा येथे ४८% तसेच मध्य महाराष्ट्रात ४२% आणि विदर्भात १७% कमी पाऊस झाला आहे.
बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
divyamarathi.bhaskar.com