भारतातील बऱ्याच भागात गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या उष्ण लहरीची तीव्रता आता कमी होणार असल्याचे दिसून आले आहे. भारतातील बऱ्याच भागांवर अनेक हवामान प्रणाली निर्माण होत असून त्याचा परिणाम येत्या ४८ तासात दिसून येईल. उत्तर भारतात काही भागात धुळीचे वादळ तसेच पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नैऋत्य मान्सून दक्षिणी द्वीपकल्पाला लवकरच येऊन पोहचेल आणि म्हणूच तापमानात घट होऊन ते पूर्ववत होईल आणि हजारोंच्या घरात जीव घेणाऱ्या उष्णतेच्या या लाटेपासून सुटका होईल.
गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे सुरु असलेल्या उष्ण लहिरीच्या प्रकोपामुळे सर्वात जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हि उष्णतेची लाट विदर्भ, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही भागात अजून सुरूच आहे.
उत्तर भारतातील हवामान:
जम्मूकाश्मीर वरील पश्चिमी विक्षोभ आणि मध्य पाकिस्तान व लगतच्या राजस्थानवर चक्रवाती हवेचे अभिसरण होत असल्याने गेल्या २४ तासात मध्य आणि पश्चिम पाकिस्तानात मोठ्याप्रमाणात पाऊस झालेला आहे. यामुळे या भागातील तापमानात ५ ते ६ अंश से. ने घट झालेली आहे. नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या या हवेचा परिणाम वायव्येकडील भारतावर झालेला आहे. उष्ण लहारीने आता माघार घेतली असून उत्तर भारतातील तापमान आता कमी होण्यास सुरुवात होईल.
मध्य भारतातील हवामान:
छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भावर अजून एक कमी तीव्रतेचे चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे त्याभागात पाऊस येण्याची शक्यता आहे. पूर्व भारतावरील या चक्रवाती हवेच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिणी द्वीपकल्प तसेच ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेसहापर्यंत होऊ शकतो. या भागात गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या दोन्ही हवामान प्रणालींमुळे मध्य भारतातील उष्ण लहरीचा तडाखा कमी होऊन तेथील तापमानही काही अंशी कमी होईल.
भारतातील द्वीपकल्पातील हवामान:
तेलंगणात अजूनही उष्ण लहरीचा उच्छाद सुरूच आहे. गुरुवारी हैदराबादचे कमाल तापमान (४२.५ अंश से.) सरासरी कमाल तापमानापेक्षा ४ अंश से. जास्त होते. तसेच निझामाबाद येथेही ४४.७ अंश से. कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. येथेही उष्ण लहरीचा तडाखा लवकरच कमी होईल असा अंदाज आहे.
Image Credit: channelnewasia.com