[Marathi] महाराष्ट्रामधे उष्णतेची लाट; उन्हाळी पिकांना पानी सकाळी दयावे

April 20, 2018 3:27 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्राच्या काही भागात उष्माघाताची स्थिती अधिक दृढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान वाढते आहे. विदर्भातील बहुतेक भागांमध्ये तापमान ४४ अंशापर्यंत वाढले आहे.

खरं तर, चंद्रपूर येथे सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेची लाट यावी अशी स्थिती निर्माण झाली आहे, कारण तिथे कमाल तापमानाची ४५. ३ अंश एवढी नोंद झाली आहे. 18 एप्रिल ला सुध्दा या शहरातील दिवसाचे कमाल तापमान ४४. ६ अंश इतके नोंदविले गेले. गुरुवारी ४४ अंशापेक्षा जास्ती तापमान असणाऱ्या जिल्यामधे गोंदिया ४४. ४ अंश , ब्रम्हपुरी ४४. ३ अंश, वर्धा व अकोला ४४ अंश यांचा सामावेश आहे.

जरी तापमान थोडे कमी असले तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील उष्ण हवामान सतत आहे. दरम्यान कोकण चे तापमान ३५ अंशापर्यंत स्थिर होत आहे ,तर मध्य महाराष्ट्रामधे ४० अंशापर्यंत कमाल तापमानाची नोंद होत आहे.

[yuzo_related]

स्कायमेटच्या हवामान अंदाजानुसार पुढील ४८ तास हवामान कोरडे राहु शकते. त्यानंतर, २३ ते २४ एप्रिलला विदर्भ आणि शेजारच्या उत्तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे कमाल तापमान २ अंशांनी कमी होऊ शकते . दरम्यान, राज्यातील इतर विभाग कोरडे राहील.

२५ एप्रिल नंतर , पुन्हा एकदा हवामान उष्ण व कोरडे रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी बांधवाना थोडा दिलासा मिळेल, दुसरीकडे, राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये कडक उष्णतेच्या लाटेचा आघात सहन करावा लागेल.

महाराष्ट्र कृषी विभागावर होणारा हवामान प्रभाव पाहू:

उष्णतेची लाट सतत असल्या कारणानी शेतकरी बंधूंनी गरजेनुसार उन्हाळी पिके, भाज्या आणि फळे यांना पानी दयावे. सिंचन संध्याकाळी दिले गेले पाहिजे.गहु बियाणासाठी साठवुन ठेवण्यापुर्वी कडक उन्हात वाळवून म ठेवावे त्यामुळे कीडीपासून गव्हाचे संरक्षण होते. २३ ते २४ एप्रिल ला विदर्भ आणि शेजारच्या उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस होऊ शकतो, म्हणून शेतकरी मित्रांनी कापणी केलेले पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी.

Image Credit:  ndma.gov         

येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीचे श्रेय skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES