Skymet weather

[Marathi] महाराष्ट्रात सुरु राहणार उष्णतेची लाट, ३ जून च्या आसपास पावसाची शक्यता

May 31, 2019 2:56 PM |

Heat wave in Vidarbha

संपूर्ण महाराष्ट्रात हवामान गेल्या अनेक दिवसांपासून गरम राहिले आहे. कोरड्या आणि गरम हवामानाच्या परिस्थितीमुळे संपूर्ण राज्यात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. खरं तर, विदर्भातील रहिवाशांना सतत तीव्र उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील एक दोन ठिकाण उष्णतेच्या लाटांशी लढत आहेत.

गेल्या २४ तासांत हवामान मुख्यतः कोरडे राहिले आहे, परंतु विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडला आहे, त्यामध्ये अमरावतीमध्ये केवळ २ मिमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्राचे चंद्रपूर शहर काल सर्वात गरम ठिकाण होते. येथे कमल तापमान ४६.८ अंश सेल्सिअस नोंदवला गेला होता, त्यानंतर ब्रम्हपुरी ४६.५ अंश सेल्सिअस, अकोला ४५.७ अंश सेल्सिअस, अमरावती ४५.८ अंश सेल्सिअस आणि परभणी येथे कमाल तापमान ४५.६ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, झालेल्या पावसाचे कारण आहे एक ट्रफ रेषा जी पूर्व मध्य प्रदेश पासून उत्तर आंतरिक कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे. तथापि, येणाऱ्या दोन दिवसात महाराष्ट्र राज्यात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल.

Also read: Maharashtra Govt mulls on another loan waiver for farmers as water scarcity intensifies

राज्यातील बहुतांश भागांमध्ये दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे आणि पुढील दोन दिवसात उष्णतेच्या लाटांपासून सुटका होणार नाही, असे दिसून येत आहे. त्यानंतर, २ किंवा ३ जून रोजी विदर्भातील काही भागात हलका पाऊस पडणे अपेक्षित आहे. पुढील, ५ आणि ६ जूनपर्यंत, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भाग देखील पाऊस अनुभवतील.

पावसामुळे राज्यात तापमान कमी होईल. राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांपासूनही काही काळ सुटका मिळेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try