राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगाणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भाग, येथे कोरडे हवामान असून उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. खरं तर, या राज्यांचे बहुतांश भागांचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे.
तापमान बदल सांगायचे तर, काल उत्तर प्रदेशच्या बांदा शहर मध्ये कमाल तापमान ४६.२ अंश, चंद्रपूर मध्ये ४५.८ अंश, श्री गंगानगर आणि हमीरपूर येथे ४५.२ अंश, नागपूर, नालगोंडा, राजनंदगाव आणि वर्धा या ठिकाणी ४५.० अंश, चुरु मध्ये ४४.५ अंश व आदिलाबाद येथे ४४.३ अंश सेल्सिअस नोंदवला गेला.
इंग्रेजीत वाचा: Heat wave to abate from entire India around May 13 due to prolonged pre-Monsoon rains
स्कायमेटच्या अंदाजानुसार, या भागात पुढील २४ ते ४८ तासांसाठी उष्णेतेच्या लाटांची स्थिती बनलेली राहील. त्यानंतर, राजस्थान राज्यात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचा आगमन होईल, ज्यामुळे राजस्थानच्या रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल. येथे, धुळीचा वादळासह पाऊस पडणे अपेक्षित आहे.
पुढे, पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी उर्वरीत आणि मध्य भारताच्या सीमेला पण स्पर्श करतील. १३ मे पर्येंत पूर्व मॉन्सून संपूर्ण भारतावर पाऊस देईल. परिणामस्वरूप, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश, येथील रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून पूर्ण पणे सुटका मिळेल.
याउलट तामिळनाडू मध्ये येणाऱ्या दिवसात पण उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. येथे सामान्यपेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवले जातील.
आमची अपेक्षा आहे कि येणाऱ्या आठवड्यात, पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींमुळे संपूर्ण भारताला उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल व कमाल तापमानात देखील लक्षणीय घट नोंदवण्यात येईल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे