महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात सुद्धा हवामान गरम आणि कोरडेच राहिलेले आहे, ज्यामुळे डाळिंब, केळी, संत्रे व अन्य भाज्यांची झाडे वाळायला लागली आहेत.
पुढील, येणाऱ्या दिवसात, दक्षिण कोकण व गोव्याच्या किनारी भागात ढगाळ आकाशासह हवामान मात्र उष्णच राहणे अपेक्षित आहे. येथे तापमान सध्या सामान्यपेक्षा जास्त नोंदवले जात आहे.
Also read: Climate Change: Agrarian distress forcing farmers to commit suicide
तथापि, ३१ मे पर्यंत, कोकण व गोव्यातील एक किंवा दोन ठिकाणी जसे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस होईल असे दिसून येत आहे. १ जून रोजी कोकण व गोव्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस होणे अपेक्षित आहे. या काळात मुंबईत देखील हलका पाऊस अनुभवण्यात येईल.
याउलट, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान मात्र गरम आणि कोरडेच राहणे अपेक्षित आहे. विदर्भातील बहुतांश भागात व मध्य महाराष्ट्राच्या एक दोन भागात येणाऱ्या एक आठवड्यात उष्णतेची लाट अनुभण्यात येईल. येथे कोरडे आणि गरम वारे वाहतील, ज्यामुळे शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी फळ व भाज्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्या.
तथापि, १ जून रोजी विदर्भात नागपूर, गोंदिया आणि ब्रम्हपुरी येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्या काळात शेतकरी बंधू पावसाळ्यात पेरल्या जाणाऱ्या रोपांची रोप वाटिका सुरु करू शकतात.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे