गेल्या २४ तासात, विदर्भात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश भाग कोरड्या हवामानासह उष्णतेच्या लाटांपासून सतत लढत आहे. याशिवाय, कोकणात हवामान अतिशय गरम असून, येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून खुप उष्णता जाणवत आहे.
आमची अपेक्षा आहे कि येणाऱ्या दिवसात हवामानाच्या परिस्थितीत बदल दिसून येईल.
महाराष्ट्राच्या जवळपास उपस्थित विविध हवामान प्रणाली ह्या प्रमुख कारण आहेत. सध्या, एक ट्रफ रेषा कोकणच्या आसपास विस्तारलेली आहे. याशिवाय, एक ट्रफ रेषा पूर्व मध्यप्रदेश पासून उत्तर अंतर्गत कर्नाटक पर्यंत विस्तारलेली आहे.
या उपस्थित हवामान प्रणालीमुळे, येणाऱ्या दोन दिवसात, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. २४ तासानंतर, पावसाचा जोर वाढेल व महाराष्ट्रातील काही भाग देखील पाऊस अनुभवतील.
कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, मुंबई, नाशिक, पुणे, नांदेड आणि औरंगाबाद येथे येणाऱ्या दोन दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे. ज्यामुळे या ठिकाणी, कमाल तापमानात देखील घट दिसून येईल.
याउलट, विदर्भातील भाग मात्र कोरडेच हवामान अनुभवतील ज्यामुळे, भाज्यांच्या शेतीला व फळांच्या बागांना पाणी नियमित द्यावे लागेल. पावसाळ्यात पेरल्या जाणाऱ्या कडधान्यांच्या शेतीसाठी तयारी सुरु करावी. मॉन्सूनच्या आगमनास विलंब अपेक्षित असल्यामुळे पेरणी जून च्या तिसरा आठवड्यापासून करणे योग्य राहील.
अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदिया, ह्या भागातील रहिवाशांना उष्णतेच्या लाटांपासून तूर्तास सुटका मिळणार नाही, असे दिसून येत आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे