१९ मे २०१५ ला झालेले धुळीचे वादळ आणि वादळी पाऊस यामुळे राजस्थान आणि गुजरातमध्ये सुरु असलेला उष्ण लहरीचा कहर थोडा आटोक्यात आला असून वाढते तापमानही कमी झालेले आहे.
उत्तर राजस्थान व त्या लगतच्या हरियाणाच्या भागांवर चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झालेले आहे.
वायव्ये कडून येणाऱ्या उष्ण हवेची जागा नैऋत्य दिशेकडून येणाऱ्या थंड हवा घेत आहे. यामुळे गुजरात व राजस्थानात कमाल तापमानत घट झाली आहे.
राजस्थानातील मान्सूनपूर्व पाऊस
चक्रवाती हवेच्या प्रणालीमुळे उत्तर राजस्थान आणि लगतच्या हरियाणाच्या भागातही काल धुळीचे वादळ आणि वादळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे तेथील कमाल तापमानही लगेचच कमी झालेले दिसून आले. बिकानेर येथे तर गारांचा पाऊस झाला असून येथे १४.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तसेच चुरू येथे १०.४ मिमी आणि पिलाणी येथे ११.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
मंगळवारी दुपारी पूर्व राजस्थानात मात्र तापमानात वाढ होत असतानाच पश्चिम राजस्थानात वादळी पावसामुळे तापमान कमी होताना दिसले. या वादळी पावसामुळे तापमानाचा पारा १० ते १५ अंश से. ने घसरला असून घाम काढणाऱ्या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला आहे.
काल उद्भवलेल्या हवामान प्रणालीमुळे काल संध्याकाळी तापमानाचा पारा २० अंश से. पेक्षा कमी होता.
राजस्थान आणि गुजरात मधील हि उष्ण लहर आता शमली असून आता या लहरीचा मोर्चा विदर्भ आणि मध्याप्रदेशाकडे वळलेला आहे. तसेच तेलंगाना आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे.
जसजसे हे चक्रवाती हवेचे क्षेत्र राजस्थानातून सरकेल तसतशी वायव्ये दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानात वाढ होईल. येत्या आठवड्याच्या शेवटी उत्तर राजस्थान, गुजरात आणि पश्चिम हरियाणा येथे पुन्हा उष्ण लहर येण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणात एक नवीन पश्चिमी विक्षोभ आला आहे. याचा परिणाम २३ ते २४ मे च्या आसपास जाणवेल.
Image credit: en.wikipedia.org