[Marathi] नागपूर, अकोला, नांदेड, परभणी  येथे उष्णतेच्या लाटेचे पुनरागमन, उन्हाळी पिकांची काढणी करावी

May 9, 2018 3:50 PM | Skymet Weather Team

महाराष्ट्रातील हवामान  बऱ्याच कालावधीपासून कोरडे आहे.राज्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रात पूर्व मौसमी गतिविधी मुळे  राज्यातीलपाऱ्यात घट झाली. असे    असून सुद्धा  दिवसाचे तापमान ४० अंशाच्या वरच नोंदवले जात आहे.

स्काय मेट वेदर च्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील हवामान साधारणतः कोरडेच राहण्याची शक्यता आहे कारण  वायव्य दिशेकडून  राज्यावर वारे वाहत आहेत . हे वारे राजस्थानातील वाळवंटि भागातून  उगम पावत आहेत.

ह्या परिस्थितीमुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. खरेतर  राज्यातील  विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र,मराठवाडा भागातउष्णतेच्या लाटेचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे. तर  दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोंकण भागात हवामान उष्ण आणिदमट राहील.

म्हणून, चंद्रपूर, ब्रह्मपुरी,नागपूर,अकोला, नांदेड, परभणी,जळगाव आणि मालेगाव  या ठिकाणी उष्णतेची लाट परतण्याची शक्यताआहे.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या  निरीक्षणानुसार, कमी दाबाचा पट्टा उत्तर तेलंगणा पासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत कार्यरत आहे, जो विदर्भआणि  दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कक्षेतुन जात आहे. वातावरणात असणाऱ्या आर्द्रतेमुळे, विदर्भांत  वादळी वारे वाहण्याची शक्यताआहे.

राज्यातील दक्षिण  महाराष्ट्र आणि दक्षिण कोंकण भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात किंचितवाढ  संभवते.

हवामानाचा महाराष्ट्रातील  कृषी घटकावर होणारा परीणाम:

सततच्या उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे, शेतकरी बंधूनी पक्व झालेली उन्हाळी पिके उदा. भात/धान, भुईमूग आणि मकापिकांची काढणी करावी. तसेच पिकलेल्या आंबा, संत्रा, मोसंबी,आणि इतर पिकांची काढणी करावी.  विदर्भात येणाऱ्या  वादळी  वाऱ्याच्या  शक्यतेमुळे  शेजारी मित्रांनी दक्ष राहावे.

ज्या ठिकाणी पिकांची काढणी झाली आहे त्या ठिकाणी खरीफ हंगामासाठी  जमीन खोल नांगरून, स्वच्छ करून तयार ठेवावी.  

Image Credit: timesofIndia

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.        

 

 

OTHER LATEST STORIES