गुजरात मध्ये बऱ्याच भागात मंगळवारपासून सतत सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मान्सूनने त्याचे गुजरातमधील अस्तित्व सिद्ध केले आहे. २२ जूनपासून मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास प्रभावी झालेला असून त्यामुळे गुजरातची किनारपट्टी तसेच मध्य गुजरात या भागात चांगलाच पाऊस होतो आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार गेल्या तीन दिवसापासून सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे नैऋत्य मान्सून कार्यान्वित झालेला आहे.
गेल्या २४ तासात अहमदाबाद येथे १३० मिमी पावसाची नोंद झाली आणि अमरेली येथे १२७ मिमी, इदार येथे १७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली, तसेच गेल्या तीन दिवसात सुरत येथे जवळपास ३०० मिमी पाऊस झालेला आहे. स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार पूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रवाती क्षेत्रामुळे तेथील सर्व आर्द्रता खेचून नेली होती पण आता गुजरात किनारपट्टीजवळ प्रणाली आता पूर्णपणे प्रभावी झाली असून पूर्ण राज्यात याचा परिणाम होताना दिसतो आहे.
स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे मान्सूनची पूर्वेकडील बाजू हि पश्चिमेकडील बाजूपेक्षा जास्त प्रभावी असते पण यावर्षी पश्चिमेकडील बाजू प्रभावी असल्याने महाराष्ट्रातील किनारपट्टी, गुजरात आणि राजस्थानात चांगल्याप्रकारे पाऊस होतो आहे.
या अति तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अमरेली, अहमदाबाद आणि राजकोट येथे जोरदार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत तसेच बरेच लोक पुरात अडकून पडले आहेत.
तसेच आता ह्या मुसळधार पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने राज्यातील पूरग्रस्त भागांना मदत कार्याला सुरुवात झाली आहे.
गेल्या २४ तासात गुजरातमधील भागात झालेल्या पावसाच्या नोंदी पुढीलप्रमाणे
Image Credit: economictimes.com