२३ जून नंतर गुजरात आणि राजस्थानातील बऱ्याच भागात पाऊस झालेला नाही. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २३ जून पर्यंत या दोन्ही राज्यात चांगलाच पाऊस झाला पण आता हि प्रणाली गुजरात मध्ये शिरून मध्य भारताकडे आणि त्यालगतच्या भागाकडे सरकली आहे.
आतापर्यंत मान्सूनने पूर्ण भारतातील भाग व्याप्त केला असून आता पूर्व भारतात आणि केरळात सक्रीय आहे.आता गुजरात आणि राजस्थान हे भाग अजून तरी काही दिवस कोरडेच असणार आहे कारण स्कायमेट या संस्थेच्या अंदाजानुसार या क्षेत्रावर एकही प्रणाली नाही.
पण गुजरातच्या किनारपट्टीला असलेल्या सुरत आणि भावनगर आणि लगतचा राजस्थान कोटा आणि चित्तोडगढ या भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. सध्या गुजरात आणि राजस्थानात कमाल तापमान ४० अंश से. असून तेथे आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढले आहे. आणि प्रखर सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश आहे आणि त्यामुळे वातावरण असह्य झाले आहे.
साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात गुजरात आणि राजस्थानात भरपूर पाऊस होतो. अरबी समुद्रात एखादी प्रणाली तयार झाली कि या भागात पावसला विश्रांती मिळते.
परंतु २९ जूनच्या आसपास निर्माण होणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुले येत्या काही दिवसात उत्तर आणि पूर्व राजस्थानात पाऊस होईल. उत्तर राजस्थान आणि हरियाणा या भागांवर प्रणालीचे रुपांतर चक्रवाती अभिसरणात होऊ शकते. असे झाले तर उत्तर आणि पूर्व राजस्थानात तुरळक पावसाची शक्यता आहे.