सक्रीय मान्सूनमुळे विदर्भाच्या काही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात सोमवार सकाळी साडेआठ पासून नागपुरमध्ये ३८. ४ मिमी, गडचिरोली २५. ८ मिमी, गोंदिया २४. ३ मिमी आणि वर्धा येथे १९.६ मिमी पावसाची नोंद झाली.
उलटपक्षी, मराठवाडा,मध्य महाराष्ट्र आणि कोकण आणि गोव्याच्याकाही भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. काही भागात फक्त हलका विखुरलेला पाऊस नोंदविला गेला आहे.
मुंबईमध्येदेखील पावसाचे प्रमाण कमी झाले असून असून कुलाबा येथे ०.६ मिमी आणि सांताक्रूझ येथे ०. ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या विदर्भात होत असलेला पाऊस हा उत्तर-पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या भागातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होय.या प्रणालीमुळे मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये अजूनही चांगला पाऊस पडत आहे.
आजही विदर्भात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. उद्यापर्यंत मराठवाड्यातील काही भागातदेखील पावसाळी गतिविधींत वाढ होईल. विशेषत: नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, नांदेड, हिंगोली, जालना आणि बीड येथे गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
२२ ऑगस्टपर्यंत मराठवाड्यात पाऊस कमी होईल,मात्र विदर्भात काही चांगल्या सरींची शक्यता आहे.
दरम्यान, किनारपट्टीवरील ट्रफ रेषा कमकुवत झाल्याने मुंबईसह कोकण आणि गोव्यामध्ये पावसात वाढ होण्याची शक्यता नाही. अशा प्रकारे, मुंबईमध्ये पावसाचे स्वरूप हलके राहणार असून वातावरण उबदार आणि दमट राहील. त्याचप्रमाणे सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक येथेही मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील तीन ते चार दिवस पावसाचे प्रमाण कमीच राहील.
Image Credits – Hindustan times
Any information taken from here should be credited to Skymet Weather