[Marathi] सक्रिय मान्सूनमुळे महाराष्ट्रातील चारही हवामान विभागात चांगला पाऊस

September 4, 2019 3:12 PM | Skymet Weather Team

सक्रिय मान्सूनच्या वाढीमुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा हवामान विभागात आज व उद्या चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा. गेल्या चोवीस तासात मुंबई व उपनगरासह कोकण आणि गोव्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे.

दरम्यान, विदर्भात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडला असून नागपूर शहरात देखील चांगला पाऊस झाला आहे. मागील २४ तासांच्या कालावधीत मुंबईतील कुलाब्यात १२२ मिमी, हर्णे ११५.४ मिमी, अलिबाग ९३.३ मिमी आणि नागपूर येथे २८.३ मिमी पावसाची नोंद झाली.

स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार मुंबईसह कोकण आणि गोव्यातही पावसाची जोर कायम राहील. मुंबई, ठाणे, डहाणू, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि अलिबागमध्ये आणखी २४ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरसारख्या ठिकाणी देखील अशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तथापि, पुणे, नाशिक आणि मालेगाव येथे एक दोन मध्यम सरींसह हलका पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, विदर्भात आणखी दोन ते तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या पावसामुळे वातावरण निश्चितच सुखकर होईल. तसेच मराठवाड्यातही पुढच्या ४८ तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पावसाचे श्रेय गुजरातवरील चक्रवाती अभिसरणांस दिले जाऊ शकते. या व्यतिरिक्त ओडिशा आणि त्याच्या आसपासच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय झाला आहे. शिवाय, उत्तर कोकण आणि गोवा ते ओडिशा पर्यंत मुख्य समुद्र सपाटीपासून ३.६ कि.मी. पर्यंत वाऱ्यांच्या वेगातील तफावत विस्तारलेली आहे.

Image Credits – Bel-India 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES