महाराष्ट्राच्या काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांत पावसाळी गतिविधींमध्ये वाढ झाली आहे. विदर्भासह कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणीमुसळधार पावसासह मध्यम पावसाने हजेरी लावली. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची नोंद झाली आहे.
मागील २४ तासांत (शनिवारी सकाळी साडेआठ वाजल्यापासून) विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडला असून नागपुरात २३ मिमी, वर्धा येथे ४८ मिमी, यवतमाळ ३१ मिमी, आणि अकोला येथे ११ मिमी पाऊस नोंदला गेला. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील काही भागात देखील चांगला पाऊस पडला आहे, परभणी येथे ११ मिमी, नांदेडमध्ये १० मिमी तर औरंगाबादमध्ये ३ मिमी पाऊस पडला आहे.
दरम्यान, जळगावात १६ मिमी, मालेगाव १ मिमी, नाशिक १८ मिमी, पुणे ३२ मिमी, सातारा १४ मिमी, कोल्हापूर १६ मिमी आणि महाबळेश्वर येथे ९९ मिमी इतका जोरदार पाऊस पडला आहे.
आता, आम्ही अपेक्षा करतो की, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज चांगला पाऊस सुरू राहील. ज्यामुळे दोन्ही भागांत पावसाच्या आकडेवारीत निश्चितच सुधारणा दिसून येईल. दरम्यान, कोकण आणि गोव्यात एक-दोन मुसळधार सरींसह मध्यम सरी बरसतील तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडेल. ह्या पावसाळी गतिविधी पुढील दोन ते तीन दिवस सुरू राहतील. ज्यामुळे दोन्ही भागातील पावसाच्या आधिक्यात सुधारणा होईल.
गेल्या २ तासांत मुंबईत पावसाचा जोर कमी झाला आहे आणि आज शहर व उपनगरामध्ये एक किंवा दोन जोरदार गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २९ जुलै रोजी पावसाळी गतिविधीत वाढ होण्याची शक्यता आहे. शहरातील वाढत्या पावसामुळे उड्डाणांचे विचलन होईल, अनेक सखल भागांत पाणी साठण्याची समस्या निर्माण होईल, तसेच लोकल गाड्यांमध्ये विलंब व स्थगिती आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ३१ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी पावसाची तीव्रता आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारे, आपण असे म्हणू शकतो की येणारा आठवडा राज्यातील पावसाच्या बाबतीत चांगला आहे.
प्रतिमा क्रेडीट: द हिन्दू
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे