[Marathi] स्कायमेट व्यवस्थापकीय संचालक, जतिन सिंह: जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा, पेरणीसाठी योग्य वेळ

June 18, 2019 2:35 PM | Skymet Weather Team

मी हे स्तंभलेखन करत असताना नमूद करू इच्छितो कि सध्या नैऋत्य मान्सूनच्या पावसात ४३ टक्के तूट आहे. हि बाब पाऊस आणि त्याची व्याप्ती या दोन्ही दृष्टीने चांगली गोष्ट नाही. खरं तर जूनच्या मध्यापर्यंत देशाच्या दोन-तृतियांश भागात मान्सूनला सुरुवात झालेली असते परंतु दुर्दैवाने सध्या देशातील केवळ १० टक्के भागात थोडाफार पाऊस झाला आहे.

जूनच्या पहिल्या १५ दिवसातील देशाच्या क्षेत्रीय भागातील पावसाची असलेली तूट हे चित्र स्पष्टपणे दर्शवत आहे. स्कायमेटकडे उपलब्ध असलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, मध्य भारत जेथे सर्वाधिक शेतीखालील क्षेत्र आहे तेथे पावसाची तूट ५८%आहे. पूर्व आणि उत्तर-पूर्व भारतात ४५% तूट आहे, तर दक्षिण द्वीपकल्प आणि उत्तर-पश्चिम भारतात अनुक्रमे ३१% आणि २१% तूट आहे.

खरं तर, पावसाच्या कमतरतेमुळे देशातील १९ जलाशयांच्या जलसाठ्यावर भीषण परिणाम झाला आहे. या जलाशयांमध्ये उपलब्ध जलसाठा ३१.६५ बीसीएम आहे, जो या जलाशयांच्या एकूण जलसाठा क्षमतेच्या फक्त २०% आहे.

जलसाठ्याचे प्रमाण 

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या देशाच्या मध्यवर्ती भागात मोडणाऱ्या प्रदेशात एकूण १२ जलाशये असून त्यांची एकूण जलसाठा क्षमता ४२.३० बीसीएम आहे. १३ जून रोजी च्या ताज्या जलसाठा अहवालानुसार, सध्या या जलाशयांमध्ये उपलब्ध एकूण जलसाठा १०.०६ बीसीएम आहे जो या जलाशयांच्या एकूण जलसाठा क्षमतेच्या केवळ २४% आहे.

क्षेत्र आणि राज्यनिहाय जलसाठ्याचे निर्गमन 

देशाच्या पश्चिम प्रांतातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १०% जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत जलसाठा १३% होता व याच कालावधीत गेल्या दहा वर्षांच्या सरासरी जलसाठ्याचे प्रमाण १७% होते. अशाप्रकारे, चालू वर्षातील जलसाठ्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या साठ्यापेक्षा कमी आहे तसेच याच कालावधीतील गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षा देखील कमी आहे.

दक्षिण प्रांतामध्ये असलेल्या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या ११% जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षाच्या याच कालावधीत जलसाठा १५% होता व याच कालावधीत गेल्या दहा वर्षांच्या सरासरी जलसाठ्याचे प्रमाण १५% होते. अशा प्रकारे, चालू वर्षातील जलसाठ्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या साठ्यापेक्षा कमी आहे तसेच याच कालावधीतील गेल्या दहा वर्षांच्या सरासरी साठ्यापेक्षा देखील कमी आहे.

तथापि, येणाऱ्या दिवसात कमी पावसाचे चित्र पालटणार असे दिसत आहे. आमचे हवामान प्रारूप १९ जूनच्या आसपास बंगालच्या खाडीमध्ये अभिसरण दर्शवित आहे. हि प्रणाली संघटित होण्याची शक्यता आहे. खरं तर, हि प्रणाली प्रभावी होऊन कमी-दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणाली मुळे जून च्या शेवटच्या १० दिवसांत पूर्व आणि मध्य भारतामध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पेरणीसाठी योग्य वेळ

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड या राज्यांना या पावसामुळे खूप फायदा होणार आहे. मुख्यतः मान्सूनवर अवलंबून असल्याने, या भागातील शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरेल. पूर्व आणि मध्य भारतामध्ये हा काळ पेरणीसाठी अत्यंत योग्य आहे.

(खालील नकाशे चालू वर्ष आणि मागील वर्षातील ११आणि १३ जून रोजीचे मातीतील आर्द्रतेचे प्रमाण दर्शवीत आहे. या वर्षातील मातीतील आर्द्रतेचे प्रमाण मागील वर्षापेक्षा खूप कमी आहे.)

 

जर दोन दिवस जोरदार पाऊस पडत राहिला आणि तापमान ४० अंशाच्या आसपास राहिले तर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि देशाच्या दक्षिणेकडील भागात इतर पिकांबरोबर सोयाबीन पीक घेतले जाऊ शकते. जर कापूस आधीच पेरला गेला असेल तर पिकाला पाणी देण्याची गरज नाही तसेच पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा हि खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये भात हे एक प्रमुख पीक असून, भाताच्या लावणीसाठी हा काळ अत्यंत योग्य आहे. शेतीला पावसाचा फायदा होईल.

पंजाब आणि हरियाणामध्येही (२१ जून-जून ३० जून) या काळात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, दोन्ही राज्यांमध्ये भात लावणी पुन्हा वेग घेईल.

दुसरीकडे, हवामान प्रारूपानुसार २५ जून च्या आसपास देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे. मुंबई मध्ये हंगामातील हा पहिला दमदार पाऊस असेल आणि मुंबईकरांसाठी निश्चितच उपयुक्त असेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES