विदर्भ आणि मराठवाडा येथे त्यांच्या भौगोलिक स्थितीमुळे होणारा पाऊस हा बऱ्याचदा खूपच अनियमित असतो. यंदा या दोन्ही भागात मान्सूनच्या पावसाने चांगली सुरुवात केली. विदर्भात जून महिन्याचा शेवट ५२% जास्त पावसाने झाला होता आणि मराठवाड्यात मात्र सामान्य पातळी पेक्षा १७% कमी पाऊस झाला होता आणि एवढा पाऊस सामान्य पातळीच्या जवळपास (+-१९%) असल्याने हवामानाच्या च्या दृष्टीने साधारण समजला जातो.
परंतु जुलै महिना या दोन भागांसाठी फारसा काही चांगला सिद्ध झाला नाही. जून महिन्यात ५२% जास्त झालेला पाऊस जुलै महिन्यात एकदमच कमी झाला आणि या भागात सरासरीपेक्षा १८% कमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यात सुद्धा पावसाची कमतरता १७% वरून ५६% झाली.
ऑगस्ट महिना अधूनमधून झालेल्या पावसामुळे चांगला ठरला. २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट मराठवाड्यात आणि विदर्भात चांगलाच पाऊस झाला आणि त्यामुळे विदार्भातील पावसाची तुट १३% झाली. तसेच मराठवाड्यातही पावसाची तुट ५६% वरून ५०% इतकी झाली.
आतापर्यंत सप्टेंबर महिनाही या दोन्ही भागांसाठी चांगला ठरला आहे. १४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह चांगलाच पाऊस झाला आहे. तसेच काही भागात खूप जोरदार स्वरूपाचा पाऊसही अनुभवावयास मिळाला आहे.
दिनांक २१ सप्टेंबर रोजी विदर्भातील पावसाच्या तुटीचा अंक उणे ८% असून मराठवाड्यात ३५% आहे.
विदर्भातील धरणे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे तुडुंब भरलेली आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या दैनंदिन वर्तमानपत्रानुसार विदर्भातील अमरावती आणि नागपूर यासह ११ जिल्ह्यात असलेली ८२३ धरणे जवळजवळ ७०% भरलेली आहेत. यात मराठवाड्यातील फक्त ९ च धरणे भरली आहेत.
विदर्भातील खरिपाच्या पिकांची आवक यंदा चांगली होईल कारण पावसाळ्याची सुरुवातच खूप चांगली झाली आणि नंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही अधूनमधून पाऊस होत राहिला. आणि आता धरणातील पाणी साठा सुद्धा चांगला झाला असल्याने तेथील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
Image Credit: article.wn.com