सप्टेंबर महिन्याचा शेवट चांगल्या आणि पिकांसाठी उपयुक्त पावसाने झाला आणि नैऋत्य मान्सूनने उत्तर भारतातून काढता पाय घेतलेला आहे. तसेच भारताच्या द्वीपकल्पाच्या भागात आणि पूर्व आणि ईशान्य भागात पाऊस सुरुच राहणार आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार हा पाऊस असाच ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात सुरु राहणे अपेक्षित आहे.
उत्तर आणि मध्य भारतातून सामान्यपेक्षा कमी झालेल्या आणि नेहमीपेक्षा आधी काढता पाय घेतलेल्या मान्सूनमुळे संपूर्ण भारतातील एकूण पावसाची आकडेवारी आता सामान्यपेक्षा १४% कमी झालेली आहे.
उत्तर भारतातून मान्सूनने जरी काढता पाय घेतला असला तरी भारताच्या द्वीपकल्पाच्या भागात अजूनही आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीच्या दोन आठवड्यात टिकून राहील.पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टीला अगदीच जवळ एक हवामान प्रणाली तयार झाली असल्याने तामिळनाडू आणि द्वीपकल्पाच्या काही भागात ऑक्टोबर महिन्याची पहिली रात्र पावसाची असेल. पूर्व आणि ईशान्य भारतातही या काळात चांगला पाऊस येईल.
याच काळात अरबी समुद्रात एक चक्रवाती अभिसरणाची प्रणाली तयार झाली असल्याने महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टीला येत्या ४८ तासात चांगला पाऊस होईल. बंगालच्या उपसागरातही चांगले हवामान असल्याने ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशात येत्या काही दिवसात पावसाची तीव्रता वाढणार आहे.
या वातावरणामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढून छत्तीसगड, बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागात काही अंशी पाऊस येईल.
ऑक्टोबर महिन्यात नैऋत्य भारतात पाऊस आणि वादळी पाऊस होतच असतो आणि त्यामुळे बराच मोठ्या काळाचा कोरडेपणा संपतो.