स्कायमेट ने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनच्या तीव्रतेत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत, कोकण आणि गोव्यातील काही भागांत तसेच विदर्भामध्ये एक दोन जोरदार सरींसह मध्यम पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कोकण क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. दरम्यान, विदर्भात पावसाळी गतिविधींत लक्षणीय वाढ झाली असून नागपूरमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे.
दुसरीकडे, मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला असून मराठवाडयात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या २४ तासांत गुरुवार सकाळी ८:३० पासून नागपूरमध्ये १०८ मिमी, महाबळेश्वरमध्ये ६७ मिमी, गोंदियामध्ये ४९ मिमी, सांताक्रूज (मुंबई) आणि वेंगुर्लामध्ये ४४ मिमी, ब्रम्हापुरीमध्ये ४२ मिमी, अलीबागमध्ये ३५ मिमी, चंद्रपूर आणि रत्नागिरीमध्ये ४३ मिमी आणि नाशिकमध्ये ३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या आंध्र प्रदेशच्या उत्तरी किनारपट्टीवर एक चक्रवाती परिभ्रमण आहे. या प्रणालीमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. नंतर ही प्रणाली तेलंगाणा आणि विदर्भकडे सरकेल त्यामुळे पावसाच्या गतिविधीत वाढ होईल. त्यामुळे कोंकण आणि गोवा येथे काही मुसळधार सरींसह मध्यम पाऊस पडेल तर विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्याच्या लगतच्या पश्चिमी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस नोंदला जाऊ शकतो. हा पाऊस पुढील २४ ते ४८ तासांच्या दरम्यान अपेक्षित आहे.
त्यानंतर, पावसाळी गतिविधी अधिक तीव्र होतील आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील अकोला, अमरावती आणि जळगाव या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. दरम्यान, नागपूरमध्ये अजून दोन दिवस चांगला पाऊस सुरू राहील.
तथापि, परभणी, लातूर, जालना आणि हिंगोलीमध्ये तुलनेने पाऊस कमी असेल, परंतु हलक्या ते मध्यम सरींची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत पावसाची तीव्रता कमी झाली आहे. परंतु पुढील २४ तासांत एक दोन जोरदार सरींसह मध्यम पावसासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल आणि काही मध्यम सरींसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
प्रतिमा क्रेडीट: eSakal
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे