मुंबईसाठी सप्टेंबर महिनाही ऑगस्ट सारखाच कोरडा चालला आहे. गेल्या पाच दिवसात शहरात खूप कमी पाऊस झाला आहे. स्कायमेट या संस्थेजवळ असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सप्टेंबर मध्ये ८.९ मिमी पाऊस झाला आहे. सर्वसाधारणपणे या महिन्यात मुंबईत ३१२.३ मिमी पाऊस होतो.
परंतु येत्या २४ तासात चांगल्याच पावसाला सुरुवात होईल कारण तसे हवामंत बदल होताना दिसून आले आहेत. हा पाऊस जरी फारसा जोरदार नसला तरी या पावसामुळे मुंबईकरांना रुक्ष वातावरणापासून दिलासा नक्कीच मिळेल.
मध्य महाराष्ट्रापासून ते लक्षद्वीप पर्यंत जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे मुंबईत पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरातच्या किनारपट्टी लगत एक कमी दाबाचा पट्टा तयार होणे अपेक्षित आहे. तसेच याचा प्रभाव कर्नाटकापर्यंत होईल आणि त्याच वेळेत तेथील पावसाचा जोरही वाढेल.
जून महिना हा मुंबईसाठी खूपच चांगला ठरला कारण याच महिन्यात मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली. दिनांक १६ जून ते २३ जून या कालावधीत मुंबईत मुसळधार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला, या पावसामुळे मुंबई शहर काही काळाकरिता ठप्प झाले होते. या पावसाला कारण ईशान्य अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते.
तसेच दिनांक २१ जुलैला असाच जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र शहरात तुरळक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात मुंबईत फक्त १५४.१ मिमी पाऊस झाला. सर्वसाधारणपणे या महिन्याची मासिक सरासरी ५२९.७ मिमी असते. यंदाची नोंद हि गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी नोंद ठरली आहे.
स्कायमेट या संस्थेनुसार सप्टेंबर महिनाही ऑगस्ट महिन्या सारखाच असणार आहे.
Image Credit: dnaindia.com