[Marathi] कोकणातील काही भागात मान्सूनचा चांगला पाऊस

June 30, 2015 4:10 PM | Skymet Weather Team

मान्सूनच्या काळात पश्चिमी किनारपट्टीला नेहमीच चांगलाच पाऊस होत असतो. कोकण आणि गोवा तसेच कर्नाटकची किनारपट्टी या भागात मान्सून काळात सर्वात जास्त पाऊस होतो आणि बऱ्याचदा या भागातील पावसाची नोंद चार अंकी सुद्धा असते.

पश्चिम किनारपट्टीला एकाच वेळी होणाऱ्या हवामान प्रणालींमुळे झालेला पाऊस हा मान्सूनचाच आहे असे म्हणता येत नाही कारण या प्रणालींमुळे होणारा पाऊस हा ठराविक भागात पडणारा नसून जोरदार असतो.

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला पश्चिम किनारपट्टीला बऱ्याच भागात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. केरळ हा एकच भाग असा होता की ज्या भागात मान्सून उशिरा सक्रीय झाला. पण गेल्या काही दिवसांपासून केरळातही मान्सून पूर्णपणे सक्रीय झाला आहे. २८ जूनला थिरूवनंतपुरम येथे ११९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तसेच २७ जूनला कोची येथे ९६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

तसेच याच काळात कोकण आणि गोव्यात मात्र मान्सून निष्क्रियच होता. सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात पावसाने चांगलाच जोर पकडलेला असून भिरा येथे ११२ मिमी आणि रत्नागिरी येथे ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे रत्नागिरी येथील पावसाची नोंद १११९ मिमी झाली आहे ह्या नोंदीत १८ जून ते २१ जून या दिवसातील सलग २४ तासात झालेला तीन आकडी पावसाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र ते केरळपर्यंत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव म्हणून सध्या ह्या भागात पाऊस होतो आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या भागात दोन किंवा जास्त दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

 

Image credit: The Hindu

 

OTHER LATEST STORIES