नैऋत्य मान्सूनच्या आगमनानंतर केरळात चांगलाच पाऊस होत असतो पण यावर्षी मात्र केरळातील पावसाचा ओघ हा मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात कमी झालेला दिसला.
केरळातील मान्सूनच्या आगमनानंतर लगेचच अशोबा या चक्रीवादळामुळे केरळातील तसेच तामिळनाडू आणि दक्षिण कर्नाटकातील आतील भागात पाऊस कमी होऊन महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगतच्या आणि कर्नाटकातील भागात पावसाचा जोर वाढला.
त्यामुळे आतापर्यत या भागात होणाऱ्या पावसात तुट दिसून आली आहे. या महिन्याच्या सरासरी पावसापेक्षा २१% तुट निर्माण झाली आहे तसेच केरळच्या बऱ्याच भागात अशीच तुट निदर्शनास आली आहे.
परंतु गेल्या ४८ तासांपासून या भागातील मान्सून प्रभावी झालेला असून राज्यात शुक्रवारी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झालेली आहे.
मान्सूनच्या काळात किनारपट्टीजवळ निर्माण झालेले कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव हा अर्धस्थायी स्वरूपाचा असतो. आणि जेव्हा हि प्रणाली सक्रीय होते तेव्हा केरळात चांगला पाऊस होतो. बंगालच्या उपसागरात जेव्हा एखादी प्रणाली तयार होते तेव्हाही मान्सूनचा प्रभाव वाढून राज्यात चांगला पाऊस होतो. येत्या काही दिवसात केरळात चांगलाच पाऊस होणे अपेक्षित आहे कारण या दोन्ही प्रणाली सक्रीय होण्याची दाट शक्यता आहे.
Image credit: The Hindu