Skymet weather

[Marathi] छत्तीसगडला उद्यापर्यंत मान्सूनच्या पाऊस सुरूच राहणार

August 20, 2015 4:52 PM |

 

evmtustछत्तीसगड येथे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा चांगलाच पाऊस सुरु आहे. तसेच छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे याला कारण म्हणजे हिमालयाच्या पायथ्याकडील भागातून जात असलेल्या मान्सूनच्या लाटेचा पट्टा आणि त्यासोबतच चक्रवाती हवेचे अभिसरण यांचा परिणाम आहे.

तसेच दक्षिण छत्तीसगड येथेही जोरदार पाऊस सुरु असून या पावसाचे कारण म्हणजे केरळ आणि कर्नाटकाची किनारपट्टी जवळील अरबी समुद्रात निर्माण झालेली हवामान प्रणाली आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या राज्यातील हवामान हे उत्तर आणि दक्षिणेकडील तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे बदलत असते कारण याचे भौगोलिक स्थान हे यासाठी महत्वाचे आहे. बहुतांश वेळा छत्तीसगड येथे बंगालच्या उपसागरात उत्पन्न होणाऱ्या हवामान प्रणालींचाही प्रभाव दिसून येतो कारण या उपसागरातील प्रणालींची दिशा पश्चिम किंवा वायव्येकडे वाहताना दिसून येते.

यासर्व गुणधर्मांमुळे हे राज्य मान्सून काळात आपल्या देशातील सर्वात जास्त पाऊस होण्यारे राज्य आहे. जूनपासून आतापर्यंत छत्तीसगड येथे ६९४ मिमी पावसाची नोंद झाली असून या भागाची मान्सूनची सरासरी ११४७ मिमी आहे.

स्कायमेट या संस्थेने दिलेल्या ताज्या हवामान वृत्तानुसार उत्तर व दक्षिण छत्तीसगड येथे येत्या २४ ते ४८ तासात चांगला पाऊस होतच राहील.

ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत पेंद्र या उत्तरेकडील भागात २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून मासिक पाऊस साधारणपणे ३६७ मिमी असतो. तसेच जगदालपुर या दक्षिणेकडील भागात २५२ मिमी पावसाची नोंद झाली असून या भागातही मासिक पाऊस साधारपणे ३५१ मिमी आहे.

सध्यातरी छत्तीसगडाच्या मध्य भागात फारसा पाऊस होत नसून या भागावर लवकरच पाऊस येईल कारण बंगालच्या उपसागरात एक नवीन हवामान प्रणाली तयार होताना दिसून आले आहे.

Image Credit: prachieee.com

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try