जुलै महिना सुरु झाल्यापासून वीस दिवस सरून गेले आहेत तरीही अजूनही विदर्भ कोरडाच आहे पण भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात विदर्भात जोरदार पाऊस होणे अपेक्षित आहे. या जोरदार पावसाबरोबरच मराठवाड्यातही २४ ते २६ जुलैला हलक्या स्वरूपाचा पाऊस येईल.
जून महिन्यात जसा मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आणि पावसाची टक्केवारी ५२% झाली तशी परिस्थिती मात्र आता नाही. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालींचा परिणाम म्हणून विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता.
आतापर्यंत विदर्भात जुलै महिन्यात झालेल्या तुरळक पावसामुळे सरासरीपेक्षा १६% कमी पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा हा आकडा नक्कीच कमी आहे, कारण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे अनुक्रमे ३५% आणि ४८% पावसाची तुट निर्माण झाली आहे.
जुलै महिन्यातील मान्सूनचा पाऊसही फारसा खूप काळ टिकून राहणारा झाला नाही हा पाऊस रोजच्या रोज झाला नाही आणि यापुढेही याचे प्रमाणही कमी असेल. उदाहरणादाखल सर्वसाधारणपणे विदर्भात १२ जुलै रोजीची पावसाची सरासरी १२.५ मिमी आहे, या वर्षी १२ जुलैला फक्त १.६ मिमी एवढाच मान्सूनचा पाऊस झाला आहे. आणि यामुळेच जून महिन्यातील जास्त पाऊस म्हणजेच ५२ टक्के अधिक झालेल्या पावसाची आकडेवारी थेट शून्यावर येऊन पोहचली आणि जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत हा आकडा पुन्हा साधारण पातळीला आला.
जुलै महिन्यातील आतापर्यंत झालेल्या २० दिवसाच्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे
सध्या विदर्भाला दिनांक २० जुलै रोजी झालेल्या भरपूर पावसामुळे तेथिल वातावरण थोडे चांगले झालेले आहे. गेल्या २४ तासात म्हणजेच विदर्भात ९.९ मिमी पावसाची नोंद झाली असून हि नोंद सरासरी च्या जवळपास (९.८ मिमी) झाली आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवाती हवेच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे येत्या २४ तासात आणि नंतरही दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्य भारत आणि इतर भागात होईल. तसेच मेडन जुलिअन ओसिलेशनही (MJO) हिंदी महासागरात प्रवेश करत असल्याने येत्या काही दिवसात विदर्भातील पावसाचे प्रमाण वाढणार असून तेथील शेतकऱ्यांसाठी हि फार महत्वाची बाब आहे.
Image Credit: economist.com