जुलै महिना हा गोव्यातील सर्वात जास्त पावसाचा महिना असतो. या महिन्यात गोव्यात सर्वसाधारणपणे ९०० मिमी पावसाची नोंद होत असते. त्यामुळे तेथे चोविस तासात तीन आकडी पावसाची नोंद होणे हि गोष्ट सामन्य आहे.
मान्सूनच्या चार महिन्याचा कालावधीत पश्चिमी किनारपट्टीला समांतर असा अर्धस्थायी कमीदाबाचा पट्टा तयार होत असतो. गोव्यातील पाऊस मुख्यत्वेकरून याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होत असतो.
बंगालच्या उपसागरात जेव्हा एखादे कामीदाबाचे क्षेत्र किंवा चक्रवती अभिसरणाचे क्षेत्र तयार होते तेव्हा हा पश्चिमी किनारपट्टीलगतचा कमीदाबाचा पट्टा सक्रीय होतो.
आत्ताच्या स्थितीनुसार भारतात दोन कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली आहेत. एक क्षेत्र पूर्व राजस्थान आणि त्या लगतचा मध्यप्रदेश चा भाग येथे आहे. तर दुसरे क्षेत्र बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे पश्चिम बंगाल व ओडीशाच्या जवळ आहे. या दोन्हीमुळे पश्चिमी किनारपट्टीलगतचा कमीदाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. यामुळे शुक्रवारी सकाळी ८.३० पासून चोवीसतासात गोव्यात १६६ मिमी पावसाची नोंद झाली. हि नोंद मागील सहा वर्षातील फक्त चोवीस तासात झालेल्या पावसाची सर्वोच्च नोंद आहे तसेच गेल्या दहा वर्षांची आकडेवारी पहिली तर हा नोंदलेला पाऊस तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या महिन्यात फक्त दुसऱ्यांदाच गोव्यात असा मुसळधार पाऊस झाला आहे. या आधी २० जुलैला ६६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली होती. काल झालेल्या पावसामुळे जुलै महिन्यात पावसाने आत्तापर्यंत ६३२ मिमी ची पातळी गाठलेली आहे. गोव्यात पुढील काही दिवस मुसळधार ते मध्यम प्रकारचा पाऊस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.
गोव्यातील मान्सून
गोव्यात ऑगस्ट मध्ये देखील पाऊस सुरूच राहतो. ऑगस्ट मध्ये सरासरीनुसार ५९१ मिमी पाऊस होत असतो. सप्टेंबर महिन्यात सुद्धा तेथे चांगला पाऊस होत असतो. गोव्यातील वातावरण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात छान असते. सर्वसाधारणपणे या महिन्यात कमाल तापमान हे २० अंश से. च्या जवळपास असते. सप्टेंबर च्या मध्या पासून तापमानात वाढ होण्यास सुरवात होते त्याच बरोबर आर्द्रता देखील वाढते त्यामुळे ३२ अंश से. सुद्धा असह्य वाटते.
Image credit- travelblog.org