Skymet weather

[Marathi] मुंबईत हलक्या पावसासह गणपती विसर्जन होणे अपेक्षित, एक दोन तीव्र सरींची देखील शक्यता

September 12, 2019 1:02 PM |

Mumbai Ganpati visarjan

मुंबईत हलक्या पावसासह गणपती विसर्जन होणे अपेक्षित आहे. एक दोन तीव्र सरींची देखील शक्यता आहे. संध्याकाळी एक दोन तीव्र सरींची देखील अपेक्षा आहे, या उत्सवांमध्ये कोणताही मोठा त्रास होणार नाही.

गेल्या २४ तासांत मुंबई पावसाची तीव्रता प्रामुख्याने कमी राहिली. तथापि, काही ठिकाणी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी एक दोन तीव्र सरींची नोंद झाली. आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह, रिमझिम पाऊस पडत आहे.

दिवसभर अधून मधून पाऊस व गडगडाटीसह पावसाच्या तीव्रतेत वाढ होण्याचा अंदाज स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. शहर आणि उपनगरामध्ये संध्याकाळच्या वेळी काही तीव्र सरी देखील दिसू शकतात, परंतु कोणत्याही अडचणीची अपेक्षा नाही आहे व गणपती विसर्जन सुरळीत पार पडणार.

१३ आणि १४ सप्टेंबरच्या सुमारास तीव्रतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये मध्यम मुंबई पाऊस पुन्हा परतेल. त्या काळात काही जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस अल्पकाली असेल आणि १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळनंतर पुन्हा पाऊस कमी होणे सुरु होईल.

Image Credits – NDTV 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try