यंदाच्या मान्सून काळात उत्तर कर्नाटकाच्या आतील भागात आतापर्यंत चांगला पाऊस झाला नव्हता. आणि दक्षिण द्वीपकल्पातील हा भाग सर्वात कमी पाऊस झालेला भाग आहे. १ जून ते १७ ऑगस्ट या काळातील या भागातील पावसाची कमतरता ४५ टक्के आहे.
तसेच या भागातील एक दोन ठिकाणीच चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. गदग येथे सोमवारी सकाळी ८.३० पर्यंत गेल्या २४ तासात ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हि नोंद गेल्या दहा वर्षातील सर्वात जास्त पावसाच्या नोंदीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी सर्वात जास्त पावसाची नोंद २० ऑगस्ट २०१० ला ९३ मिमी झाली होती.
ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत गदग येथे १०५ मिमी पावसाची नोंद झाली असून हि नोंद मासिक सरासरीपेक्षा (८७.२ मिमी) जास्त आहे. उत्तर कर्नाटकातील आतील भागातील मासिक सरासरी हि मुळातच कमी आहे आणि त्यामुळेच या भागात एकदा जरी जोरदार पाऊस झाला तरी हि सरासरी भरून निघण्यास मदत होते.
तामिळनाडूच्या दक्षिण भागावर आणि अरबी समुद्रावर चक्रवाती अभिसरणचा पट्टा तयार झाला असून त्याचा परिणाम गदग पर्यंत होत असल्याने तेथे चांगला पाऊस होत आहे. आता हा पट्टा दक्षिणेकडे सरकत असून पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान गदग येथे येत्या २४ ते ४८ तासात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील.
Image Credit: The Hindu