जून महिन्यात मान्सूनची सुरुवात संपूर्ण भारतासह द्वीपकल्पाच्या भागातही चांगली झाली होती. या भागात जून महिन्यात सामान्य पेक्षा १९% जास्त पाऊस झाला होता. परंतु जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यात एकदमच कमी पाऊस झाल्यामुळे सामान्य पातळीपेक्षा २०% कमी पाऊस झाला.
सप्टेंबर महिना मात्र चांगला पाऊस घेऊन आला असे म्हणावयास हरकत नाही. आठवड्याच्या सुरुवातीला चांगलाच पाऊस झाला पण उत्तरार्धात मात्र पावसाची तीव्रता कमी झाली. तसेच दिनांक २३ सप्टेंबरला पावसाची कमतरता १५% झाली असून आधीपेक्षा ५% सुधारणा झालेली आहे.
आता पुन्हा एकदा या भागात पावसाचा जोर वाढणार असून तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि रायलसीमा येथे व्यापकतेने पाऊस येणे अपेक्षित आहे. सध्यस्थितीत तामिळनाडू आणि त्यालगतच्या दक्षिण कर्नाटक आणि केरळ या भागावर एक चक्रवाती अभिसरणाची प्रणाली आणि दुसरी लक्षद्वीप या भागावर आहे. या दोन्ही प्रणालींमुळे भारतीय द्वीपकल्पाला भरपूर पाऊस होणे अपेक्षित आहे.
हा पाऊस साधारणपणे ३ ते ४ दिवस सुरु राहणे अपेक्षित आहे. त्यानंतर केरळ आणि दक्षिण कर्नाटकाची किनारपट्टी या भागात हा पाऊस मर्यादित असेल. बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कोडाईकनाल येथे २७.८ मिमी, निझामाबाद येथे २५ मिमी, मडिकेरी येथे १५ मिमी, मैसूर येथे ८ मिमी आणि कोइम्बतुर येथे ३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.