गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर फक्त पूर्व आणि ईशान्य भारतातच सुरु आहे. सुरुवातीला बिहार आणि झारखंड या भागांवर असलेल्या चक्रवाती अभिसरणाचा परिणाम दिसत होता. नंतर मान्सूनची लाट हिमालयाच्या पायथ्याकडील भागात सरकली आणि त्याचा परिणाम हिमालयाच्या उपभागात म्हणजेच पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, अरुणाचलप्रदेश आणि मेघालय दिसून आला.
आता मात्र या परिस्थितीत बदल होताना दिसून येत असून चक्रवाती अभिसरणाची प्रणाली बांगलादेश आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागरावर दिसून आली आहे. तसेच या भागावर तयार होणारे ढगही मान्सूनची नवीन प्रणाली तयार होत असल्याचे दर्शवित आहे. आणि याचा परिणाम बांगलादेश आणि त्यालगतच्या सागरावरच होईल. आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या भागात तुरळक पाऊस होण्याची शक्यता आहे.
या हवामान प्रणालीचे रुपांतर नंतर कमी दाबाच्या क्षेत्रात होईल. आणि अजूनही हवामान वर्तविण्याच्या मॉडेल्सनुसार याची तीव्रता फारशी वाढणार नाही याला कारण म्हणजे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भाग तीव्र हवेपासून वंचित असतो.
येत्या २४ तासात पश्चिम बंगालची किनारपट्टी, आंध्रप्रदेश, ओडिशा, नागालंड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथे व्यापक पाऊस होण्याची शक्यता आहे. ओडीशातील भाग आणि पश्चिम बंगालच्या भागात दुपारच्या गरम आणि दमट वातावरणातही चांगला पाऊस होईल.
स्कायमेट या हवामान संस्थेचे या हवामान प्रणालीकडे लक्ष असणार आहे.
Image Credits: The Hindu