गेल्या काही दिवसांपासून केरळ आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असून कर्नाटक आणि गोवा या किनारपट्टीलगतच्या भागात व्यापक आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होत आहे. आपल्याला हे तर माहितच आहे कि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अशोबा या चक्रीवादळामुळे भारतीय किनारपट्टीकडील आर्द्रतेच्या स्वरूपातील उर्जा कमी होऊन त्याचा परिणाम मान्सूनच्या येणाऱ्या लाटेवर झाला आणि त्याची क्षमताही कमी झाली आणि त्यामुळेच काही भागात जास्त तर काही भागात कमी पाऊस होतो आहे.
अशोबा चक्रीवादळ विरले कि मान्सूनच्या हालचालीला वेग येऊन पश्चिम किनारपट्टीला होणाऱ्या पावसाचे प्रमाणही वाढेल. सध्या या चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेली असून त्या भागात कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण झाले आहे आणि यामुळे मान्सूनची क्षमता वाढलेली आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राकडून केरळच्या किनारपट्टीकडे वाहण्यास सुरुवात झालेली असल्याने येत्या २ – ३ दिवसात पश्चिम किनारपट्टीला जोरदार पावसाची अपेक्षा आहे.
दरम्यानच्या काळात पश्चिम किनारपट्टीला गेल्या २४ तासात भरपूर पाऊस झालेला आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबईत ८२ मिमी पावसाची नोंद झाली असून आता मान्सून मुंबईच्या वेशीपर्यंत आला आहे असे म्हणायला हरकत नाही. तसेही मुंबईत मान्सूनचे आगमन १० जूनच्या आसपास होत असते.
महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि पुण्यात अनुक्रमे ४१ मिमी आणि ३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे तसेच गोवा येथेही ४२ मिमी पाऊस झाला आहे.
कर्नाटकातील कारवार येथे मात्र खूपच जोरदार पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कारवार येथे १९४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तसेच होनावर आणि मंगरूळ येथेही अनुक्रमे ६४ मिमी आणि ४५ मिमी पावसाची नोंद झाली. केरळातील कोची येथे ९३ मिमी आणि कोझिकोडे येथे ५१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार नव्याने आलेल्या मान्सूनच्या लाटेमुळे पुढील २ – ३ दिवस या भागांमध्ये असाच पाऊस सुरु असणे अपेक्षित आहे.
Image Credit: indiatv.com