Skymet weather

[Marathi] अरबी समुद्रात या वर्षांतील चौथे चक्रीवादळ "माहा" तयार झाले असून लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकात पाऊस देणार

October 31, 2019 12:00 PM |

cyclone Maha

अखेरीस बऱ्याच अपेक्षेनंतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळ "माहा" मध्ये रूपांतरण झाले असून, अरबी समुद्रातील यंदाचे हे चौथे चक्रीवादळ ठरले आहे. आमच्या हवामानतज्ञांच्या अनुसार, आज पहाटे ५:३० वाजता, चक्रीवादळ माहा अक्षांश ९अंश उत्तर आणि रेखांश ७४.१ अंश पूर्वेस लक्षद्वीपजवळ होते.

चक्रीवादळ माहा वायव्य दिशेने वाटचाल सुरू ठेवेल आणि मध्य-पूर्व अरबी समुद्रामध्ये राहील, तीव्रतेत वाढू होवून ते आज तीव्र चक्रीवादळ बनेल.

गेल्या २४ तासांत लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, अमिनीदीव येथे तब्बल २०3 मिमी आणि मिनीकॉय येथे ११8 मिमी पावसाची नोंद केली गेली. केरळमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे केरळ, कर्नाटकच्या किनारी भागांत आणि रायलसीमासह तामिळनाडूच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर समुद्र अत्यंत खवळलेला राहण्याची अपेक्षा आहे.

तसेच, चक्रीवादळाच्या सान्निध्यामुळे येत्या २४ तासांत लक्षद्वीप बेटांवर जोरदार ते अत्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्यामुळे या प्रदेशात लाटांची उंची १०-१५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे .

पुढील ४८ तास समुद्रामध्ये न जाण्याचा सल्ला मच्छीमार बांधवांना देण्यात येत आहे. चक्रीवादळ माहा चा थेट भारतीय मुख्य भूभागावर परिणाम होण्याची अपेक्षा नसून कयार च्या वाटेवर मार्गक्रमण करण्याची अपेक्षा आहे.

Image Credits – Times Now 

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try