अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या २४ तासांत पुणे व मध्य महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये चांगला पाऊस पडला आहे. स्कायमेटकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरात ३८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
‘आणखी काही काळ ही प्रणाली कायम राहण्याच्या शक्यतेमुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस सरी सुरूच राहतील’, असा अंदाज स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
आज देखील, पुणे शहरात एक किंवा दोन चांगल्या सरींची अपेक्षा असून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बर्याच भागात देखील अशीच परिस्थिती उद्यापर्यं राहण्याची अपेक्षा आहे, तथापि उत्तर महाराष्ट्रात २४ तासानंतर पाऊस कमी होण्यास सुरवात होईल.
दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही तीव्र सरींमुळे सध्या सुरू असलेल्या निवडणुकीच्या कामकाजात अडचण येऊ शकते. येत्या २२ आणि २३ ऑक्टोबरला हलक्या पावसाची शक्यता असून पुणे व इतर शहरांमध्ये २३ ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
याकाळात संपूर्ण भागामध्ये हवामान ढगाळ असेल आणि वातावरण आल्हाददायक राहील. सामान्यत: ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाल्यावर पाऊस ओसरण्यास सुरवात होते. तथापि, सध्या सुरू असलेला पाऊस याला अपवाद आहे कारण पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील बर्याच भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी अनुभवल्या जात आहेत.
Image Credits – Telegraph India
Any information taken from here should be credited to Skymet Weather