Skymet weather

[Marathi] मान्सून २०१५ च्या आगमनाची सुरुवात आणि प्रगती

May 15, 2015 7:03 PM |

Monsoon in Indiaस्कायमेट या भारतातील हवामान संस्थेने २२ एप्रिल २०१५ रोजी जाहीर केल्यानुसार मान्सूनचे आगमन हे नेहमीपेक्षा लवकर होणार यावर शिक्का मोरतब झालेला दिसून येत आहे. कारण नुकत्याच केलेल्या परीक्षणानुसार मान्सून अंदमानच्या समुद्रात १८ ते २० मे दरम्यान येऊन पोहचेल असे संकेत आहेत. तसेच केरळात मान्सूनचे आगमन २७ ते २९ मे रोजी होईल आणि त्याबरोबरच भारताच्या उत्तरपूर्वेस असलेल्या भागातही मान्सून येऊन पोहचेल. तसेच दक्षिण भारतातील बऱ्याच ठिकाणी आणि उत्तरपुर्वेकडील भागात मान्सूनचा पाऊस ६ ते ९ जून दरम्यान येईल. आणि नंतर मान्सूनचा वेग थोडासा कमी होऊन मुंबई व  पश्चिम  किनारपट्टी आणि  कलकत्ता येथे ११ ते १४ जून ला मान्सूनच्या पावसाचे आगमन होईल. तसेच जूनच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच २२ ते २४ जूनला मान्सून मध्य भारत व पूर्वेकडील भागात पोहचेल. पश्चिम राजस्थान वगळता २ ते ५ जुलै दरम्यान भारतातील बऱ्याच भागात मान्सूनची हजेरी लागेल तसेच १४ जुलै पर्यंत भारतातील सर्वच भागात मान्सूनची हजेरी लागलेली असेल.

Monsoon Onset

Image credit -Indian Express

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try