[Marathi] बिहार पूर: थोड्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस गया आणि पाटण्यात परतणार, पूरस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता

October 3, 2019 12:49 PM | Skymet Weather Team

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी अद्याप कमी होत नाही तोच गडगडाटासह पाऊस पुन्हा एकदा बिहार राज्यात धडकण्यास तयार आहे.

स्कायमेट हवामानतज्ञांच्या अनुसार, थोड्या विश्रांतीनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा पावसाळी गतिविधी वाढू लागल्या आहेत. पाटणा, गया आणि इतर अनेक जिल्ह्यांत तुरळक जोरदार सरींसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

पुढील तीन ते चार पाऊस दिवस सुरू राहण्याची अपेक्षा आहे. अशाप्रकारे, मुसळधार पावसामुळे पाणी साचणे आणि पूर येण्याचा धोका पुन्हा एकदा बिहार राज्यावर घोंघावत आहे.

मोठ्या प्रमाणात पावसामुळे, जमीन आधीच संतृप्त आहे आणि जमिनीत अधिक पाणी शोषण्याची पुरेसे क्षमता शिल्लक नाही. या पावसामुळे राज्यातील अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही अनेक भागात पाणी साचल्याने नागरिक पूर परिस्थितीशी झगडत आहेत.

हवामानशास्त्रज्ञ म्हणतात, 'आगामी पावसामुळे काही चांगले होणार नसून परिस्थिती आणखीनच बिघडेल'.

काही काळानंतर, पाटणा, गया आणि बिहारच्या पश्चिम भागातील जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात होईल, परंतु भागलपूर, पूर्णिया या पूर्वेकडील आणि दक्षिणपूर्व जिल्ह्यात नजीकच्या काळात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पावसाचे श्रेय बिहार आणि झारखंडवरील चक्रवाती अभिसरणास दिले जाऊ शकते, आणि पुढील दोन ते तीन दिवस हि परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. शिवाय बंगालच्या उपसागरातुन येणाऱ्या दमट वार्‍यामुळे पावसाला अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

Image Credits – Deccan Herald 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES