गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत, विशेषत: कोल्हापूर आणि सांगली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रहिवाशांचे आयुष्य दयनीय झाले आहे. खरं तर, रस्त्यांवर पुराचे पाणी साचल्याने महामार्गावरून कोल्हापूरकडे जाणारा रस्ता दिसत नसून फक्त घरांची छप्परे आणि झाडेच दिसत आहेत.
कोल्हापूरची काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात उड्डाणपुलावरून दिसणारी जवळपास प्रत्येक इमारत किमान १० फूट पाण्यात बुडाली आहे. इतकेच नाही तर वाहतूक करणारे ट्रक शहरापासून कमीतकमी ३०-४० किमी अंतरावर थांबवले गेल्याने रहिवाशांपर्यंत भाजीपाला, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचू शकत नाहीत.
कोल्हापूरमध्ये पूरात ४ जणांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफने सुमारे ९७ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. जवळपास ४००० घरे उद्ध्वस्त झाली आहेत. महाराष्ट्रातील पूरस्थितिमुळे मृतांची संख्या आता तब्बल २७ वर पोहोचली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दोन लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून कोल्हापूर आणि सांगली हे सर्वाधिक नुकसान झालेली शहरे आहेत. सांगलीमध्ये सुमारे ८७ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
सांगली व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी एनडीआरएफ, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय सैन्य यांच्याकडून बचावकार्य जोरात सुरू आहे.
कोल्हापुरातील २३ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत तर १८ गावे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शक्य ते सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे.
Image Credits – Firstpost
Any information taken from here should be credited to Skymet Weather