Skymet weather

[Marathi] झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे काश्मीरमध्ये पूर येण्याची भीती

June 25, 2015 6:48 PM |

Srinagar rainबुधवारपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु असलेल्या मान्सूनच्या पावसामुळे गुरुवारी सकाळी झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आणि त्यामुळेच राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी अनंतनाग आणि पुलवामा येथे पूर येण्याची धोक्याची सूचना जाहीर केली आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ तासात राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येतच राहील. अनंतनाग येथे झेलम नदीच्या पाण्याची पातळी २५ फुट असून हि पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा ४ फुट वर आहे. तसेच श्रीनगर येथील राम मुन्शिबाग येथे नदीच्या पाण्याची पातळी १७.१० फुट असून हि पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा (१९ फुट) थोडी कमी आहे म्हणजे २ फुट कमी आहे. पाकव्याप्त काश्मीर भागातही जोरदार पाऊस झालेला आहे आणि झेलम नदीच्या पाण्याची पातळीत वाढ होण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे. स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या राज्यात मान्सूनही प्रभावी झालेला आहे आणि त्याच बरोबर पश्चिमी विक्षोभही प्रभावी झाला आहे.या दोन्ही प्रणालींचा एकत्रित प्रभाव होऊन या भागात जोरदार पाऊस होतो आहे. मान्सूनचे आगमन जम्मू काश्मीरमध्ये २४ जूनलाच झालेले आहे. बुधवारी सकाळी ८.३० पासून २४ तासात राज्यात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे

KASHMIR TABLE

Image Credit: rediff.com  






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try