[Marathi] पावसामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा

June 14, 2015 5:15 PM | Skymet Weather Team

भारतातील बहुतांश भागावर काल चांगला पाऊस झाला. या पावसामुळे उकाडा आणि उष्णता या पासून सामान्यांना दिलासा मिळाला आहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना हा पाऊस म्हणजे जीवनरेखा असल्या सारखेच आहे कारण या भागातील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती उत्पन्नावरच अवलंबून आहे.

या झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांसाठी आवश्यक असलेली जमिनीतील आर्द्रता भरून निघाली आहे.

गेले तीन दिवस विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून येत्या २४ तासात या भागात मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेतील हवामान विभागानुसार अकोला, अमरावती, बुलढाणा आणि चंद्रपूर येथे गेले ४८ तास संततधार पावसाची नोंद झाल्यामुळे मान्सून येण्याची नांदी झाली आहे. आताच्या हवामानाच्या अंदाजानुसार येत्या ४८ ते ७२ तासात विदर्भातील बऱ्याच भागांवर चांगला पाऊस अपेक्षित आहे तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

याभागात सामान्यतः पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विदर्भात जिरायती शेतीचे प्रमाण जास्त आहे म्हणून पाऊस जर कमी झाला तर कर्जाला कंटाळून दरवर्षी खूप शेतकरी आत्महत्या करतात.

गेल्या तीन दिवसातील पावसाच्या नोंदी पुढीलप्रमाणे

Rainfall figures in mm (Featured Image Credit: thehindubusinessline.com)

OTHER LATEST STORIES