Skymet weather

[Marathi] फनी चक्रीवादळ अधिक तीव्र, ३ मे च्या सुमारास ओडिशा किनारपट्टीला चांदबाली आणि गोपालपूरच्या दरम्यान धडकणार

May 1, 2019 1:48 PM |

Odisha rains

अपेक्षेपेक्षा आधीच गंभीर चक्रीवादळ 'फनी' ने दक्षिण-पूर्व बंगालच्या दक्षिण-पश्चिम व लगतच्या भागात अत्यंत गंभीर चक्रीवादळाचे रूप घेतले आहे. सध्या ते १३.३ अंश उत्तर अक्षांश आणि ८४.७ अंश पूर्व रेखांश स्थित असून, ओडिशातील पुरीपासून ७२५ किमी दक्षिण-पश्चिम आणि आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम पासून ५१० किमी दक्षिण-पूर्व पूर्वेकडे केंद्रित आहे.

फनी आता गती घेईल आणि १ मे पर्यंत उत्तरपश्चिम दिशेने जाणार आहेत, त्यानंतर उत्तर-उत्तरपूर्व दिशेने ओडिशाकडे फिरेल.

दरम्यान अत्यंत तीव्र चक्रीवादळ फनी ३ मेच्या सुमारास ओडिशाच्या किनारीभागावर गोपालपूर आणि चांदबाली दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्याकाळात हि प्रणाली अत्यंत गंभीर चक्रीवादळाची ताकद टिकवून ठेवेल, परंतु किनाऱ्यावरील प्रतिकूल परिस्थितीमुळे म्हणजेच समुद्राच्या पृष्ठभागाचे कमी तापमान, कमी आर्द्रता तसेच किनाऱ्यावरील वरच्या दिशेने वाढलेली वाऱ्यांची विषमता यामुळे चक्रीवादळाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता आहे.

तीव्र चक्रीवादळ फनी किनारीभागावर धडकण्याच्या वेळी जोरदार पाऊस व अतिवृष्टी होण्याची, तसेच १७० ते १८५ किमी प्रतितास या वेगाने वारे ज्याच्या झोताचा वेग २०५ किमी प्रतितास जाण्याची शक्यता आहे. याकाळात तीव्र वीजा कोसळण्याची देखील शक्यता आहे.

Also read: Fani becomes Extremely Severe Cyclone, to hit Odisha on May 3 near Gopalpur and Chandbali coast 

पुढील तीन दिवसात समुद्रातील परिस्थिती फारच धोकादायक असून मच्छीमारांना खुल्या पाण्यात न जाण्याचा कळकळीचा सल्ला देण्यात येत आहे. यादरम्यान समुद्रात १३ ते १४ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीमुळे सखल भागांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, तीव्र वाऱ्यांमुळे कच्ची घरे व रस्त्यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी लोकांना घरामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

प्रतिमा क्रेडिट्स: पिंटरेस्ट

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try