सरते शेवटी आता एल निनोला निरोप देण्याची वेळ आली आहे, हळूहळू ENSO तटस्थ स्थितीकडे मार्गक्रमण करत आहे. स्कायमेटनुसार, विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात सलग तिसर्या आठवड्यात घट होत आहे. खरं तर, या आठवड्यात ही घसरण लक्षणीय होती, ज्यामध्ये तापमान गेल्या आठवड्यातील ०.४ अंश सेल्सियसवरून ०.१ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे.
हवामानतज्ञांच्या मते, निनो निर्देशांकातील चढ-उतार अगदी सामान्य आहे. याआधीही, निनो-३.४ निर्देशांक २२ जुलै रोजी ०.२ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला होता परंतु त्यानंतर लवकरच पुढील दोन आठवड्यांपर्यंत वाढत गेला. तथापि, हे चढउतार अल निनोच्या तटस्थतेकडे वळण्याचे सूचित करीत आहेत.
तटस्थ परिस्थिती घोषित करण्यासाठी, ओशॅनिक निनो इंडेक्स (ओएनआय) नुसार निनो-३.४ प्रदेशातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानातील विसंगती सलग तीन महिन्यांपर्यंत ०.५ अंश सेल्सियसच्या उंबरठ्या खाली स्थायिक झाली पाहिजे.
आतापर्यंत, ओएनआय मूल्ये गेल्या सलग नऊ महिन्याच्या अवधीसाठी सामान्य सरासरीच्या वर आहेत. परंतु गेल्या दोन भागांमध्ये ओएनआय मूल्ये कमी होण्याचा कल देखील दर्शवित आहेत. अशाप्रकारे, आता आम्ही आशा करतो की जून-जुलै-ऑगस्टच्या पुढील भागात आवश्यक तापमान ०.५ अंश सेल्सियसपेक्षा कमी होईल.
एल निनोची परिस्थिती ढेपाळण्याची संगती बहुतेक हवामान प्रारूपांनी केलेल्या पूर्वानुमानानुसार आहे जे आधी मान्सूनच्या उत्तरार्धात एल निनोत घट होण्याबद्दल सूचित करत होते. त्यानुसार जून आणि जुलैच्या तुलनेत स्कायमेटने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज दिला होता.
सध्या एल निनोची केवळ ३०% संभाव्यता असून पुढे मार्गक्रमण करत असताना त्यात घट होणार आहे आणि ENSO ची तटस्थ परिस्थिती हिवाळ्याच्या हंगामापर्यंत टिकण्याची शक्यता आहे.
हवामानतज्ञांच्या अनुसार, एल निनोचा आता मान्सूनच्या पावसावर किमान परिणाम होईल. ऑगस्टमध्ये पावसाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मॉन्सूनची स्वतःची गतिशीलता आणि मदत करणारे घटक आहेत आणि सागरी घटकांच्या अनुपस्थितीत देखील चांगली कामगिरी केली आहे.
Image Credits – Twitter
Any information taken from here should be credited to Skymet Weather