[Marathi] अल-निनो अजून संपलेला नाही, मान्सून २०१९ अद्याप त्याच्या सावलीत

July 10, 2019 4:04 PM | Skymet Weather Team

अलीकडील विषुववृत्तीय समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानाच्या नोंदी पाहता असे वाटत होते की अल-निनो ने पायउतार होण्यास सुरूवात केली आहे. तथापि, त्याने पुन्हा एकदा आपली उपस्थिती नोंदवली आहे.

तीन आठवड्यांत सतत खाली पडल्यानंतर, निनो-३.४ क्षेत्रातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान जे भारतीय मान्सूनसाठी चिंतेचा विषय आहे, गेल्या आठवड्यात पुन्हा वाढले आहे. तथापि, कमी झाले असूनही, सगळे निनो निर्देशांक मर्यादेपेक्षा अधिक आहेत. प्रशांत महासागरातील विविध निर्देशांकाचे वर्तमान मूल्य खालीलप्रमाणे आहे.

केवळ एवढेच नाही तर, निनो-३.४ क्षेत्रामधील समुद्राच्या तापमानातील विसंगतीची सरासरी असलेला तीन महिन्यांचा महासागरीय निनो निर्देशांक (ONI) देखील किमान मर्यादेच्या वर आहे. सध्या ओएनआय निर्देशांक (एप्रिल-जून करीता) ०.७ अंश सेल्सियस इतका आहे.

गेल्या आठ भागांतील तीन महिन्यांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या महासागरीय निनो निर्देशांक (ओएनआय) चे सरासरी मूल्य खालीलप्रमाणे आहे:

सतत होत असलेल्या समुद्राच्या तापमानाकडे पाहता ऑस्ट्रेलियातील प्रमुख हवामान संस्था ब्यूरो ऑफ मेटरोलॉजी (BoM) ने अल-नीनो सूचक सल्ला मागे घेतला आहे आणि असे मानले जाते की निर्देशांक मर्यादित संख्येच्या खाली राहील. उर्वरित जगभरातील हवामानविज्ञान संस्था ०.५ अंश सेल्सियस हि मर्यादा रेषा मानतात, याउलट BoM ०.८ अंश सेल्सिअस ला मर्यादा रेषा मानते.

हवामान प्रारूपांच्या अनुसार जुलै महिन्यात अल-निनोची शक्यता ७० ते ७५% पर्यंत कायम राहिली आहे. प्रत्यक्षात चालू असलेल्या मान्सून हंगामात ही शक्यता ५०% पेक्षा जास्त राहिली आहे.

यावर्षीच्या मान्सूनच्या कामगिरीवर परिणाम

यावर्षी मान्सूनच्या हंगामात जूनमध्ये आपण अल निनोचा प्रभाव आधीच पाहिला आहे, ज्यामुळे पावसाची ३३% इतकी प्रचंड तूट राहिली. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचे झालेले पुनरुत्थान पाहिले, परंतु आता काही काळ मान्सून विश्रांती घेणार असून त्यामुळे पावसामध्ये खंड पडणार आहे.

बहुतेकदा, देशात ऑगस्टमध्ये पावसात खंड पडतो तोपर्यंत मान्सूनने संपूर्ण भारत व्यापलेला असतो. यावर्षी अशी परिस्थिती अद्यापपर्यंत झालेली नाही, परंतु यावर्षीच्या हवामानाची परिस्थिती आणि अल निनोच्या वर्षांत असलेल्या हवामानाची परिस्थिती जवळजवळ समान आहे.

अल निनो दरम्यान, मान्सून मध्ये जास्त आणि दीर्घकाळापर्यंत खंड पडण्याची अपेक्षा करतो. MJO (मॅडेन-जूलियन ऑसिलेशन) आणि IOD (हिंद महासागर डायपोल) यासारख्या मान्सूनला अनुकूल इतर सर्व घटक उपस्थित आहेत, परंतु अल नीनो एक विलक्षण घटना आहे जी सर्व घटकांवर वर्चस्व राखण्याची शक्ती राखते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES