रविवार सकाळपासून पूर्व उत्तर प्रदेशाच्या बऱ्याच भागात मान्सूनचा जोरदार पाऊस सुरु झाला आहे, या पावसामुळे उष्ण आणि घाम काढणाऱ्या वातावरणापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.
भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार या भागातील मान्सूनचा हा पहिलाच चांगला पाऊस आहे. तसेच या पावसामुळे पूर्व उत्तर प्रदेश जो आतापर्यंत कोरडाच होता आणि सरासरीपासून खूपच लांब होता, ती तुट भरून निघाली आहे.
२४ जून पर्यंत या भागात ७६% कमी पाऊस झाला होता पण २५ ते २७ जून दरम्यान झालेल्या पावसाने हे तुट भरून निघाली असून आता ३९% झाला आहे. स्कायमेट नुसार पूर्व उत्तर प्रदेशावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने या भागात तसेच लगतच्या बिहारच्या काही भागात पाऊस होतो आहे. येत्या २४ तासात या पावसाचा जोर कमी होईल कारण कमी दाबाच्या क्षेत्राची क्षमता कमी होऊन ते मान्सूनच्या लाटेत विलीन होईल. तसेच या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस होतच राहील.
वातावरणात झालेल्या बदलामुळे कमाल तापमानातही ५ ते ७ अंश से. कमी झाले आहे तसेच किमान तापमानही थोडेसे कमी झाले आहे.
Image Credit: India Today