हवामान प्रणाली
गेल्या तीन दिवसांपासून राजस्थानवर एक चक्रवाती परिस्थिती बनलेली आहे, ज्याच्या प्रभावाने राज्यातील बऱ्याच भागात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी म्हणजे, धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात आली आहे.
खरं तर, राजस्थान मधील जयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि कोटा मध्ये गेल्या २४ तासात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी जोराच्या वेगाने वारे पण वाहत आहे. तसेच, चुरु, सीकर, बिकानेर, श्री गंगानगर आणि हनुमानगढ, येथे पण पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी अनुभवण्यात येत आहे.
Also read in English: Jaipur, Jodhpur, Jaisalmer, Churu, Jhunjhunu, Sikar and Bikaner to witness dust storm and rains
या शिवाय, पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींमुळे कमाल तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. आता पर्यंत राज्यातील बरेच भाग ४५ अंशाचा कमाल तापमानासह उषातेची लाट अनुभवत होते. परंतु चालेल्या पावसामुळे कमाल तापमान ४० अंश पर्यंत गेल्या काही दिवसांपासून नोंदवण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळाली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या तीन दिवसात पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी राजस्थानवर जोर पकडतील व आज आणि उद्या जोरदार पावसाची पण शक्यता आहे. परंतु, १५ मे पासून, कारण हवामान प्रणाली पूर्व दिशेत पुढे वाढेल, हळू हळू राजस्थान मधील हवामान स्पष्ट होणे सुरु होईल.
राज्यातील बहुतांश भाग जसे, जोधपूर, जैसलमेर, बारमेर, सीकर, जयपूर, हनुमानगढ, बिकानेर, श्री गंगानगर, चुरु आणि कोटा या ठिकाणी येणाऱ्या दिवसात पावसाची नोंद करण्यात येईल. परिणामस्वरूप, रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल.
पुढे, १६ मे पासून, हवामानाची दिशा बदलेल आणि बहुतांश भागातील हवामान कोरडे होईल. कोरडे हवामानामुळे तापमानात पुन्हा एकदा वाढ दिसून येईल, ज्यामुळे उष्णतेची लाट परतण्याची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे