Skymet weather

[Marathi] जयपूर, हनुमानगढ, श्री गंगानगर, अलवार, बिकानेर आणि कोटा मध्ये आज पण पावसाची शक्यता

May 14, 2019 9:26 AM |

dust storm

स्कायमेटच्या अंदाजानुसार, गेल्या २४ तासात, राजस्थानच्या बऱ्याच भागात धुळीचा वादळासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुख्यतः, उत्तर, मध्य आणि पूर्व भागात, चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

दुसरीकडे, राज्यातील दक्षिण भाग जसे, बारमेर, जोधपूर आणि जैसलमेर, येथे हवामान मात्र कोरडेच राहिले. याशिवाय, श्री गंगानगर, हनुमानगढ आणि त्याच्या आसपासच्या भागात गारपीटची पण नोंद करण्यात आली आहे.

Also read in English: Dust storm and rains to continue in Jaipur, Hanumangarh, Sri Ganganagar, Alwar, Bikaner and Kota

तापमान बदल सांगायचे तर, चालणाऱ्या गतिविधींमुळे, राजस्थान मध्ये तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे, खरं तर, दिवसाचे तापमान सामान्यच्या जवळ नोंदवले जात आहे, ज्यामुळे रहिवाशांना प्रचंड गर्मी पासून सुटका मिळाली आहे.

आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसात सुद्धा पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी जसे, धूळ, गारपीट, मेघगर्जनेसह पाऊस राजस्थान मध्ये अनुभवण्यात येईल. पाऊस मुख्यतः दुपारी किंवा संध्याकाळी अनुभवला जाईल. अशीच स्थिती येणाऱ्या दोन ते तीन दिवस बनलेली राहील. याशिवाय, तापमान पण सामान्यच्या जवळ नोंदवले जातील.

राज्यातील भाग जसे श्री गंगानगर, हनुमानगढ, बिकानेर, चुरु, सीकर, जैसलमेर, बारमेर, जोधपूर, पाली, जालोर, या ठिकाणी येणाऱ्या एक आठवड्यात धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. या भागातील तापमानात पण लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. या भागांना प्रचंड गरमी पासून सुटका मिळाली आहे.

याशिवाय, पावसाच्या आगमनामुळे, असा दिसून येत आहे की सध्या तरी येणाऱ्या एक आठवड्यात
उष्णतेची लाट परतण्याशी शकयता नाही आहे. तापमान पण सामान्यपेक्षा कमी या सामान्यच्या जवळपास नोंदवले जातील. त्यांनंतर हवामानाची परिस्थिती एकदा पुन्हा बदलेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try