एक पश्चिमी विक्षोभ उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू काश्मीरवर बनलेला आहे. त्याच्या प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती दक्षिण पश्चिम राजस्थानवर उपस्थित आहे. दोन्ही हवामान प्रणाली उत्तरपूर्व दिशेत पुढे चालली आहे, ज्यामुळे गेल्या २४ तासात पंजाब आणि हरियाणा मध्ये विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार पंजाब आणि हरियाणा मधील बऱ्याच भागात येणार २४ तासात विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल. पुढील ४८ तासात, तापमानात २ ते ३ अंशांनी घट दिसून येईल. दिवस आरामदायक राहील. दुपारी किंवा संध्याकाळी, पावसाची गतिविधी जोर पकडेल व रात्र होता होता, दोन्ही राज्यात चांगल्या पावसाची नोंद करण्यात येईल.
Also read in English: Dust storm and pre-Monsoon showers to continue in Punjab and Haryana until May 15
याशिवाय, ५० ते ६० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील. गेल्या २४ तासात, लुधियाना, पटियाला, हिसार, रोहतक, कर्नाल आणि अंबाला मध्ये पाऊस पडलेला आहे. या भागातील तापमानात पण काही अंशांनी घट दिसून आली आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, दोन्ही राज्यांवर १५ मे पर्यंत हलक्या ते मध्यम विखुलेल्या पावसाची नोंद करण्यात येईल.
अमृतसर, बर्नाला, भटिंडा, फरीदकोट, फिररोझपूर, गुरुदासपूर, होशियारपूर, जालंधर, कपुर्थळा, मोगा, पटियाला आणि रुपनगर मध्ये धुळीचा वादळासह पावसाची शक्यात आहे. येथे ६० ते ८० किलोमीटरच्या वेगाने वारे वाहतील.
मतदानाच्या वेळी हवामानावर एक नजर
दुपारच्या वेळी हरियाणा मध्ये हवामानाची स्थितीत सुधारणा अपेक्षित आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस अनुभवण्यात येत आहे, ज्यामुळे तापमान कमीच राहिलेले आहे. संध्याकाळी गडगडाटी पावसाची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे