संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस खूपच कमी राहिलेला आहे.
खरेतर कोरड्या वातावरणाला सुरुवात नोव्हेंबर महिन्यापासून होवून ही परिस्थिती साधारण मे महिन्यापर्यंत राहते. या कालावधीत मासिक पर्जन्यमान देखील खूप कमी असते, पण या वर्षी राज्यात तुलनेने कमी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
विभागानुसार ही तूट कोंकण-गोव्यात 57%, मध्य महाराष्ट्रात 74%, मराठवाड्यात 87% तर विदर्भात 99% इतकी आहे.
सध्या, दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फरक देखील खूप जास्त आहे. दुपार अतिशय गरम असून कमाल तापमान 30 अंशाचा वरती आहे तर अंतर्गत भागांवर किमान तापमान 13 ते 16 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे.
सध्या पूर्वेकडून बंगालच्या खाडीतून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यामुळे दिवसाच्या तापमानात घट अपेक्षित आहे.
दरम्यान , बंगालच्या खाडीवर एक कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे, ज्यामुळे पुढील 2-3 दिवस महाराष्ट्रात पूर्वेकडून वारे येतील ज्यामुळे आर्द्रता थोडी वाढेल आणि गरम हवामानाच्या परिस्थितीतून काही सुटका होईल, अशी आशा आहे .
Image Credits – TripAdvisor
Any information taken from here should be credited to Skymet Weather