[Marathi] सांगली, कोल्हापूर , वेंगुर्ला येथे गडगडाटी वादळ येण्याची शक्यता;मुंबई, पुणे, नागपूर येथे कोरडे हवामान

May 10, 2018 4:11 PM | Skymet Weather Team

स्काय मेट वेदर ने दिलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये परत एकदा उष्णतेची लाट निर्माण झाली असुन, विदर्भामध्ये त्याचे सर्वात जास्त प्रमाण आहे . मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तापमान वाढले आहे. शिवाय जिथे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे त्याही ठिकाणचे कमाल तापमान वाढले आहे.

काल ब्रम्हपुरी आणि चंद्रपूरचे कमाल तापमान अनुक्रमे ३.९ अंशांने वाढुन ४६. ७ व ४६. ४ एवढे नोंद झाले. शिवाय, नागपूर, नांदेड, परभणी, वर्धा, अकोला येथेही उष्णता जास्त होती, तेथील कमाल तापमान ४५ अंश एवढे नोंद गेले. दुसरीकडे कोकणातील तापमान सामान्य पातळीवर ३५ अंशाच्या जवळपास नोंदविले गेले.

सध्या विदर्भ, मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणातील हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे,तर विदर्भामध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहील. तर येत्या २४ तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण भागात ढगांच्या गडगडाटासह हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, आणि वेंगुर्ला या भागात गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. हे वादळ निर्माण होण्यासाठी वाऱ्याचा खंड कारणीभूत आहे.

[yuzo_related]

हा वाऱ्याचा खंड, वारे उत्तर कर्नाटक कडुन तामिळनाडू कडे वाहत असताना पडलेला आहे. परंतु त्याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये दक्षिणेपेक्षा कमीच आहे. म्हणुन विदर्भ, मराठवाडा व उत्तर मध्य महाराष्ट्रात आणि उत्तर कोकणातील हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे. परभणी शहरातसुद्धा उष्णतेची लाट येऊ शकते ,पण कोकणातील कमाल तापमान हे सामान्य तापमानाएवढे नोंद होईल अशी अपेक्षा आहे.

हवामानाचा महाराष्ट्रातील कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;

अति उष्णतेचा तडाखा पाहता त्याचा परिमाण लिंबूवर्गीय फळांवर होऊ नये म्हणून शेतकरी बांधवानी फवारणी करून घ्यावी . त्याचप्रमाणे नवीन डाळींब आणि चिक्कू च्या रोपांना आधार देण्यासाठी काठीचा वापर करावा म्हणजे जास्ती वारे आले तरी ती रोपे सुरक्षित राहतील.

वादळ व पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणून काढलेली पिके नीट साठवुन ठेवावी . दक्षिण कोकण मध्ये खरीफ भाताची रोप लावणी करण्यासाठी वाफे तयार करून ठेवावे. भूईमूग काढणी पूर्ण करावी

Image Credit: YouTube

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.       

 

 

OTHER LATEST STORIES