वायव्य भारतात साधारणतः मान्सूनचे आगमन जून महिना अर्धा संपल्यावर होतो परंतु या वर्षी मात्र वेळेआधीच या भागात भरपूर पाऊस झालेला आहे. भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार जून महिन्याचा शेवट सरासरीपेक्षा ३१% जास्त पाऊस झाला. या भागातील उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश हे फक्त दोन भाग असे आहेत कि ज्या भागात कमी पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यात जून महिन्यापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या कमी पाऊस झाला. त्यामुळे ३१% जास्त पावसाचे प्रमाण कमी होऊन ११% येऊन पोहचले. फक्त तीनच उपभागात सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
ऑगस्ट महिन्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असे वाटत नाही. स्कायमेट या संस्थेकडे असलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात दिनांक १६ पर्यंत जास्त पावसाची टक्केवारी १ वर आली आहे.
गेले २ ते ३ दिवस वायव्य भारतात चांगला पाऊस होताना दिसून आला आहे. परंतु हा पाऊस ज्या मान्सूनच्या पट्ट्यामुळे होत होता तो पट्टा आता दिल्लीच्या उत्तरेकडे कडे सरकला असून हळू हळू हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन स्थिरावेल.येत्या २४ तासात हि प्रणाली हिमालयाच्या पायथ्याच्या दिशेने पुढे सरकेल आणि त्यामुळे वायव्य भारत मात्र कोरडाच राहील. तसेच जम्मूकाश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.
येत्या २४ तासात पूर्व उत्तर प्रदेशात मात्र चांगला पाऊस होईल कारण मान्सूनच्या कमी दाबाच्या पट्टा तिथूनच सरकतो आहे. डोंगर पायथ्याला जवळ असलेल्या गोरखपूर, गोंडा, कुशीनगर, लखीमपुर खेरी आणि महाराजगंज या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.