[Marathi] मे महिन्यात पुणे आणि नाशिकमधे हवामान कोरडेच, उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती

May 25, 2019 4:15 PM | Skymet Weather Team

पुणे आणि नाशिक हि दोन्ही शहरे पश्चिम घाटाच्या पायथ्याशी साधारणपणे २००० फूट उंचीवर स्थित आहेत. सामान्यत: हि दोन्ही शहरे अंतर्गत भागात असल्यामुळे देशाच्या उत्तर व दक्षिणेकडील भागांवर प्रभाव पाडणाऱ्या विविध हवामान प्रणालींपासून दूर राहतात.

या दोन्ही शहरांकरीता एप्रिल हा सर्वाधिक गर्मीचा महिना आहे. तथापि, या शहरांमध्ये उष्णतेमुळे मे महिन्यात पूर्व मान्सून गतिविधी दिसून येतात. नाशिकमध्ये मे महिन्यात सरासरी २४.५ मिमी, तर पुण्यात तुलनेने जास्त म्हणजेच ४०.६ मिमी पाऊस पडतो. तथापि, मे महिन्यातील पावसाच्या प्रमाणात सामान्यपेक्षा तफावत खूपच जास्त असते. कधीकधी, या शहरांत जास्त पाऊस पडतो, तर काही वेळेस परिस्थिती याउलट असते.

यावर्षी मे महिन्यात दोन्ही शहरांतील हवामान पाऊस नसल्याने कोरडेच राहिले आहे. मागील वर्षांबद्दल सांगायचे तर पुण्यात २०१३ मध्ये तर दुसऱ्या बाजूला, नाशिकमध्ये २०११, २०१३ आणि २०१८ मध्ये मे महिना कोरडा होता. यावेळेस देखील गेल्या वर्षी सारखीच परिस्थिती राहणार असून, उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे वातावरण अधिक उष्ण झाले आहे.

काल, पुणे येथे ३९. ८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जे सामान्यपेक्षा ४ अंश जास्त होते. यावर्षी २८ एप्रिल हा पुण्यासाठी सर्वात उष्ण दिवस होता या दिवशी ४३ अंश तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान यावेळेस मे महिन्यामध्ये पुण्यात तापमानाने दोन वेळेस चाळीशी पार केली, २० आणि २१ मे रोजी अनुक्रमे ४१.३ आणि ४१.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्याच्या मानाने नाशिकमध्ये उष्णता थोडी कमी आहे, २० मे रोजी शहरात ४०.३ अंश तर २१ मे रोजी ४०.१ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले.

दरम्यान संपूर्ण मे महिना कोरडाच राहण्याची अपेक्षा आहे. सामान्यतः मान्सूनच्या आगमनाच्या वेळी, काही पूर्व मान्सून पावसाळी गतिविधी होतात परंतु यावेळी मान्सूनला विलंब होणार असल्यामुळे पुढील काही दिवस तरी पावसाळी गतिविधींची शक्यता नाही.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES