Skymet weather

[Marathi] केंद्राकडून दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला २१६० कोटींचा निधी,पाण्याची पातळी १९ टक्क्यांनी खालावली

May 8, 2019 5:28 PM |

Maharashtra drought

महाराष्ट्र राज्यात पुन्हा दुष्काळा ची परिस्थिती आहे. शिवाय, राज्यातील जलसाठा १९. ३५ टक्क्यांवर गेला आहे, जो मागील वर्षापासून ११. ५ टक्के घटला आहे, परिणामी गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा दुष्काळ पडला आहे.

गेल्या वर्षी जलसाठ्याचे प्रमाण ३०. ८४ टक्के होते . औरंगाबाद हे सर्वात प्रभावित क्षेत्र आहे जेथे जलसाठ्याचे प्रमाण फक्त ५.१४ आहे जे मागील वर्षी २८. २ टक्के इतके होते . नागपूर दुसऱ्या क्रमांकावर असून जलसाठ्याचे प्रमाण १०. १७ टक्के आहे जे मागील वर्षी १५. ९१टक्के होते. नाशिकमध्ये १७. ७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे ज्याचे प्रमाण २०१८ मध्ये ३२. ६६ टक्के होते.

लातूर, बीड, जालना, औसा आणि धारूर यासह मराठवाडातील अनेक भागांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते .

राज्य सरकारच्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांमधील १८२ तालुक्यांमधील लोकांना ४,७७४ पाण्याच्या टँकर ने पाणी पुरवले गेले आहे. एवढेच नाही तर ९ लाख गुरे चारा छावणी मध्ये आहेत.

एकूण स्थिती पाहता दुष्काळी परिस्थिती शी सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला २,१६०कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडला असून राज्याला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून निधी पुरवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे आभार मानले आहेत.

इंग्रेजीत वाचा: Drought hit Maharashtra gets 2160 crore from centre after water levels drop to 19 percent

फडणवीस यांनी ट्विटर च्यामायक्रो ब्लॉगिंग साइट द्वारे पंतप्रधानांना आभारप्रदर्शन करून आतापर्यंत केंद्र सरकारकडून ४,२४८. ५९ कोटी रुपयांची मदत मिळाली हे हि नमूद केले.

जेव्हा दुष्काळी परिस्थितीत विरोधी पक्षाने फडणवीसांवर हल्ला केला तेव्हा फडणवीस यांनी निवडणूक आयोगास पत्र लिहून सांगितले की, महाराष्ट्रात मतदान संपले असल्याने त्यांना मुभा देण्यात यावी आणि दुष्काळग्रस्तांसाठी उपयुक्त उपाययोजना करण्यास परवानगी मिळावी .

अशाप्रकारे, निवडणूक आयोगाने आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र सरकारला दुष्काळग्रस्तांसाठी उपयुक्त उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try