२०१८-१९ दरम्यान मागणीत घट, मंदावलेला वापर आणि कॉर्पोरेट कमाई, ग्रामीण मजुरीत घट, या अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त गोष्टीमध्ये वाढ नोंदवण्यात आलेली नाही.
जानेवारी-मार्चच्या परिणामांनुसार जाहीर केलेल्या अहवालात देखील सांगितले आहे कि अनेक ग्राहक उत्पादनांमध्ये झालेलया घसरणीत ग्रामीण विक्रीत झालेली घसरण एक कारण आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या अनुसार येणारी परिस्थिती हि आगामी सरकारद्वारे प्रोत्साहन जाहीर करण्यास पुरेशी आहे.
फेब्रुवारीमध्ये वास्तविक किंवा महागाई-समायोजित शेती वेतन मागील महिन्यातील १.५% वाढीच्या तुलनेत २% नी वाढले आहे. त्याचप्रमाणे, वास्तविक शेतमजुरी व्यतिरिक्त मजुरीमध्ये वाढ कमी झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात १.४% नी वाढ झालेली आहे जी मागील महिन्यात २% होती.
हिंदुस्तान टाइम्सने आढावा घेतलेल्या श्रमिक ब्युरोच्या आकडेवारीनुसार मागील नऊ महिन्यांमध्ये वाढ ४% पेक्षा जास्त झाली नाही. श्रमीक ब्युरोची आकडेवारी आणि हिंदुस्तान टाइम्सने घेतलेला आढावा एकत्रितपणे ग्रामीण भागातील रोजगाराचे विदारक चित्र उभे करत आहे. गेल्या वर्षी ग्रामीण भागातील कमाईत बरेच महिने घसरण नोंदवली गेली. उदाहरणार्थ, एप्रिल ते जुलै २०१८ दरम्यानच्या चार महिन्यांत शेतीच्या मजुरीमध्ये वास्तविक किंवा चलनवाढ समायोजित वाढ नकारात्मक चालू राहिली.
ग्रामीण भागातील हळूहळू वाढणारी उत्पादित वस्तूंची मागणी उत्पादन वाढीस कारणीभूत असते. तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंची उच्च मागणी उत्पादन वाढीस कारणीभूत असते ज्यामुळे कंपन्या त्यांचे उत्पादन वाढवितात आणि आर्थिक गतीचा वेग वाढतो.
Also read: Rural incomes slow down, may impose incentive
चौथ्या तिमाहीत असंख्य राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक आणि कॉर्पोरेट निर्देशक पडले. उदाहरणार्थ, भारतातील सर्वात मोठ्या ग्राहकोपयोगी उत्पादक कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरची मागील १८ महिन्याच्या तुलनेतील नीचांकी विक्री जानेवारी ते मार्च या तिमाहीत झाली. कंपनीने याचे एक कारण "ग्रामीण मागणीतील घट" असे म्हटले आहे.
इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रॉडक्शनने मोजल्या गेलेल्या देशातील कारखाना उत्पादनात २१ महिन्यांत पहिल्यांदाच मार्चमध्ये नकारात्मक वाढ नोंदवली जी ०.१% असून, हि अर्थव्यवस्थेत मंदीची स्पष्ट चिन्हे आहेत. आयआयपीमध्ये, उत्पादन क्षेत्रात मार्चमध्ये 0.४% घट झाली, खाण आणि वीज या क्षेत्रात देखील कमकुवत वाढ अनुक्रमे 0.८% आणि २.२% वर गेली.
मंदीला दुजोरा देताना अर्थ मंत्रालयाने मार्चच्या "मासिक आर्थिक अहवालात" खाजगी वापरामध्ये आणि निर्यातीत घट झाल्याचे मान्य केले आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे