[Marathi] मुंबईत नैऋत्य मान्सूनचा शेवट निराशाजनक

September 29, 2015 4:31 PM | Skymet Weather Team

जून महिन्यात मुंबईत मान्सूनची सुरुवात धडाकेबाज झाली होती. आतापर्यंतच्या सर्वात जास्त झालेल्या पावसाची नोंद १९७१ मध्ये १०३७.१ मिमी होती. हे रेकॉर्ड ब्रेक करत यंदा जून महिन्यात मुंबईत १११७ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबईत झालेल्या या धुंवाधार आणि व्यापक पावसाचे प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्रातील अशोबा हे चक्रीवादळ होते.

परंतु त्यानंतर मात्र मुंबईत मान्सूनच्या पावसाने दडी दिल्यासारखेच झाले. जुलै आणि ऑगस्ट मध्ये गेल्या दहा वर्षांचा आढावा घेतल्यास यंदा खूपच कमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यातही अशीच परिस्थिती झाली आहे. तसेच या महिन्यात झालेला कमी पाऊस हि गेल्या दहा वर्षातील दुसरी नोंद ठरली आहे.

भारतातील स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागानुसार २०१५ मधील नैऋत्य मान्सूनवर एल निनो चा खूपच जास्त प्रभाव झाला. याचा परिणाम म्हणून जून महिन्यानंतर अरबी समुद्रात एकही हवामान प्रणाली तयार झाली नाही. यामुळे मान्सूनच्या लाटेची क्षमता कमी झाली आणि मुंबईत कमी पाऊस झाला.

गेल्या चार महिन्यात मुंबईत झालेल्या पावसाचा आढावा घेऊ या

 

 

सांखिकी दृष्ट्या बघितल्यास २०१५ मधील मान्सून साधारणपणे २००९ मध्ये झालेल्या मान्सून सारखाच झाला असे दिसून आले आहे. २००९ हे वर्ष सर्वात जास्त दुष्काळाचे ठरले होते.

२००९ या वर्षी मुंबईत झालेल्या पावसाची नोंद १८६६ मिमी होती आणि यंदाही मुंबईतील पावसाची नोंद १८३३ मिमी आहे.

 

OTHER LATEST STORIES